रिलायंस जिओचा स्वेदशी अॅप जिओमीट आता यूजर्ससाठी उपलब्ध आहे. रिलायन्स जिओने गुरूवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी JioMeet अॅप लाँच केलं आहे.
JioMeet हे अॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झालं असून हे वापरण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. हे अॅप पूर्णतः मोफत असणार आहे. या अॅपची वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे 100 पेक्षा जास्त यूजर्स एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर जुळू शकतात.
या अॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करणे, स्क्रीन शेअर करणे असेच अनेक फीचर्स आहेत तसेच या अॅपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाही. डेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही JioMeet चा वापर करु शकतात. तसेच JioMeet अॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करतं.
लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता JioMeet हा अजून एक पर्याय युजर्सला मिळाल्याने लोकप्रिय अॅप झूमला भारतीय पर्याय मिळाला आहे.
या प्रकारे करा डाउनलोड-
मोबाइल यूजर्स प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर JioMeet सर्च करुन डाउनलोड करु शकतात.
डेस्कटॉप यूजर्स https://jiomeetpro.jio.com/home#download या वेबसाइटवर जाउन अॅप्लिकेशन डाउनलोड करु शकतात.