suvichar

रिलायन्स जिओ कंपनी देणार अवघ्या 50 पैशात इंटरनॅशनल कॉलिंगची सुविधा

Webdunia
सोमवार, 14 मे 2018 (11:04 IST)
रिलायन्स जिओने वर्षभरापूर्वी टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश करत धक्का दिला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. त्यानंतर ग्राहकांना विविध ऑफर्स देत सातत्याने आकर्षिक करण्यात जिओ यशस्वी झाले आहे.
 
सध्या परदेशात राहणार्‍यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कंपनीने या ग्राहकांसाठी एक खास ऑफर नुकतीच जाहीर केली आहे. 15 मे म्हणजेच येत्या मंगळवारपासून हा नवीन प्लॅन सुरु होणार असून यामध्ये अतिशय कमी दरात तुम्हाला परदेशात असलेल्या आपल्या जवळच्या व्यकतीशी संवाद साधता येणार आहे.
 
यामध्ये कॉलिंगसाठीचा दर प्रतिमिनिट 50 पैसे इतका ठेवण्यात आला असून रोमिंग 2 रुपये प्रतिमिनिट असेल. जिओच्या पोस्टपॅड प्लॅनचाच एक भाग असलेली ही नवीन सुविधा ग्राहकांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. या प्लॅनची बेसिक रक्कम 199 रुपये इतकी असून ही रक्कम ग्राहकांना दरमहा भरावी लागेल. विशेष म्हणजे आपल्या नंबरवर इंटरनॅशनल कॉल सर्व्हिस सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे सिक्युरीटीडिपॉझिट ठेवण्याची आवश्यकता नाही. या शानदार ऑफर्सद्वारे ग्राहक अमेरिका किंवा कॅनडाला 50 पैसे प्रतिनिट या दराने कॉल करु शकतात. तर बांगलादेश, चीन, फ्रान्स आणि लंडनमध्ये कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट 2 रुपये खर्च करावा लागेल. इस्त्रायल, नायझेरिया, सौदी अरब, स्वीडन आणि अन्य देशात एक मिनिट बोलल्यास 6 रुपये प्रतिमिनिट खर्च येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रोमिंगसाठीही कोणताही नवीन डेटा प्लॅन घेण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

अशोक खरात प्रकरणात नवे वळण, वडेट्टीवार यांनी एचआयव्हीच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, अनुष्का शर्माला पहिल्यांदाच स्थान मिळाले

कोलंबिया विमान अपघात 66 जणांचा मृत्यू, अनेक जण अद्याप बेपत्ता

पुढील लेख
Show comments