Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
, गुरूवार, 6 मे 2021 (12:34 IST)
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात आवश्यक म्हणजे वेळोवेळी SpO2 तपासत राहणे. याने ब्लड ऑक्सिजन पातळीबद्दल माहिती मिळते. बाजारात अनेक स्मार्ट बँड्स उपलब्ध आहेत जे SpO2 मॉनिटरसह येतात. येथे आम्ही आपल्याला स्वस्त ब्रॅड्सची माहिती देत आहोत-
 
OnePlus Smart Band 
OnePlus Smart Band याची किंमत केवळ 2,499 इतकी आहे. आपण ऑनलाइन खरेदी करु शकता. कमी किंमत असली तरी फीचर्स शानदार आहेत. या बँडमध्ये 1.1 इंच AMOLED डिस्प्ले आहे. याने ब्लड ऑक्सिजन सेचुरेशन मॉनिटर करता येतं. याने आपण मोबाईलचे काही ‍फीचर्स देखील कंट्रोल करु शकता. यात कॉल-मेसेज नॉटिफिकेशन मिळतं. वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी हे IP69 रेटिंगसह येतं.
 
Lenovo E1 Pro SmartWatch (3- ATM) 
Lenovo E1 Pro SmartWatch (3- ATM) ची किंमत 2,999 रुपये इतकी आहे. 1.4 इंच स्क्रीनच्या या स्मार्टवॉच द्वारे आपण SpO2 आणि ब्लड प्रेशर देखील मॉनिटर करु शकता. ही वॉटरप्रूफ रेटिंगसह येते. यात कॉल-मेसेज व्यतिरिक्त व्हॉट्सअॅप सर्पोट देखील आहे ज्याने कुठलंही नोटिफिकेशन सुटतं नाही.
 
Oppo Smart Band Style 
Oppo Smart Band Style ची किंमत 2,799 रुपये इतकी आहे. ही Continuous SpO2 Monitoring फीचरसह येते. याने आपण कुठेही SpO2 मॉनिटर करु शकता. 
 
यात 1.1 इंच AMOLED डिस्प्ले आहे. हे स्मार्ट बँड 40 वॉच फेस आणि 12 वर्कआउट मोडसह येतं. यात योगा, पोहणे, क्रिकेट या सारखे वर्कआउट मोड सामील आहे. हे रियल टाइम हार्ट मॉनिटरसह येतं.
 
Amazfit Bip U
Amazfit Bip U ची किंमत इतर बँड्सपेक्षा अधिक असून 3,999 रुपये इतकी आहे. यात आपल्याला कॉल, मेसेज, अॅप्स यासह कँलेडरसाठी स्मार्ट नॉटिफिकेशन पाहायला मिळतं. हे Heart Rate Monitoring and PAI Heath Assessment System सह येतं. यात देखील ब्लड ऑक्सिजन लेवल बघता येतं. 1.42 इंच स्क्रीन असून स्ट्रेस लेवल मॉनिटर करण्यात देखील मदत करतं.
 
Realme Fashion Watch
Realme Fashion Watch ची किंमत 3,438 रुपये इतकी आहे. 1.4 इंच स्क्रीन असून याने आपण फोनचा कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल करु शकता. व्हॉट्सअॅप, कॉल, मेसेज आणि इतर अॅप्ससाठी यात स्मार्ट नॉटिफिकेशन दिलं गेलं आहे. याने ब्लड ऑक्सिजन लेवल मापता येतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या