Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बोगस लोन अ‍ॅप्स प्रकरणात सरकार मोठी कारवाई करणार

बोगस लोन अ‍ॅप्स प्रकरणात सरकार मोठी कारवाई करणार
, सोमवार, 30 मे 2022 (14:09 IST)
असे अनेक लोक आहेत जे छोट्यामोठ्या कार्यासाठी कर्ज घेतात. बॅंकेतून कर्ज घेण्यासाठी भल्यामोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. किरकोळ कर्ज घेण्यासाठी देखील बँकेतून कर्ज घेण्यासाठी अनेक प्रोसेस असतात. या कामासाठी बराच वेळ लागतो. आणि बरेच डॉक्युमेंट द्यावे लागते. आता बाजारात असे अनेक लोन अ‍ॅप्स आले आहे. जे कमी कालावधीत जास्त काही डॉक्युमेंट न घेता कमी पैशांसाठी लोन देतात. या लोन अ‍ॅप्स वरून काही तासातच लोकांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येतात. वेळीच पैसे मिळत असल्यामुळे बरेच लोक या लोन अ‍ॅप्सचा वापर करतात. काही लोन अ‍ॅप्स हे प्रामाणिक असतात तर काही फ्रॉड कंपन्या लोन अ‍ॅप्सच्या नावाखाली बाजारात उतरल्या आहेत. गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अ‍ॅप्स दिसतात त्यात खरे कुठले आणि फसवे कुठले हे शोधणं अवघड असते.
 
 बोगस लोन अ‍ॅप्स प्रकरण हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं असून गृहविभाग या संदर्भात इंटरपोलची मदद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात सरकार मोठ्या प्रमाणाची कारवाई करत सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोल कडे प्रकरण देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 
 
अ‍ॅप्सद्वारे झटपट लोन देऊन मग वसुलीसाठी धाकदपटशा आणि ब्लॅकमेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आता यात इंटरपोलची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.
 
लोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवणूक करणारे नेपाळमधून आपल्या कारवाया करत असल्याची चर्चा आहे. यात ग्राहकांची फसवणूक करून मिळणारे पैसे हे चीनकडे वळवले जात असल्याचं उघड झालंय. राज्यात लोन अ‍ॅप्ससंदर्भात तब्बल 1800 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या मुळे अशा बनावटी आणि फसवे  बोगस लोन अ‍ॅप्सच्या बळी जाण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.या अ‍ॅप्सचा संबध आंतराष्ट्रीय पातळीवर असल्याचे समजले आहे. या संदर्भात सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चारधाम यात्रेवर निघालेल्या गाडीचा भीषण अपघात,दोघे जागीच ठार