Marathi Biodata Maker

तर मग तुमचं ट्विटर अकाऊंट कायमच बंद होईल

Webdunia
सहा महिन्यांहून अधिक काळ न वापरलेले ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याचा इशारा ‘ट्विटर’कडून देण्यात आला आहे. ही कारवाई सहा महिन्यांपासून साइन इन न केलेल्या अकाऊंट्सवरही होणार आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत अकाऊंट साइन इन न केल्यास ते कायमचे बंद केले जाईल. हे अकाऊंट बंद होण्याआधी युजरला ‘ट्विटर अलर्ट’ पाठवला जाईल. त्यानंतरही साइन इन न केल्यास किंवा अकाऊंट न वापरल्यास युजरचा ट्विटर अकाऊंट कायमचा बंद करण्यात येईल.
 
अॅक्टिव्ह नसलेल्या युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचे काम सुरू आहे. यामुळे इतर युजर्सना चांगली सेवा मिळू शकेल आणि त्यांचा ट्विटरवरील विश्वास वाढेल, असं ट्विटरच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे अकाऊंट्स बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असंदेखील त्यांनी म्हटलंय.
 
बंद केलेल्या ट्विटर अकाऊंटचे ‘युजर नेम’ दुसऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपले अकाऊंट सक्रिय आहे हे दाखवण्यासाठी युजरला कोणतेही नवीन ट्विट करण्याचे गरजेचे नाही. युजर्सना फक्त लॉग इन करून ट्विटरच्या काही सूचनांचं पालन करावं लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात एफडीएची पाच जिल्ह्यांत धाड, भेसळयुक्त दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश;१३ जणांना अटक

LIVE: महाराष्ट्रात बनावट दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश

सोनम रघुवंशीच्या चुकांबद्दल सिया गोयलने गूगलवर शोध घेतला होता, डिजिटल हिस्ट्रीमधून महत्त्वपूर्ण खुलासा

भयंकर! भरधाव ट्रकने ६ जणांना चिरडले, तीन मुलांचा दुर्देवी मृत्यू

स्पेनने पोर्तुगालला एका गोलने हरवले, अंतिम सामन्यात रोनाल्डोला रडू कोसळले

पुढील लेख
Show comments