suvichar
✕

व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी, मिळेल 50 टक्के सूट

Webdunia
काही दिवसाअगोदर व्होडाफोन आणि आयडिया विलीन झाल्यानंतर कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी प्रचंड योजना सुरू करीत आहे. आता कंपनी त्याच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. 
 
नवी दिल्ली : गेले दिवस व्होडाफोन आणि आयडिया विलीन झाल्यानंतर कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी प्रचंड योजना सुरू करीत आहे. आता कंपनी त्याच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने केलेल्या नवीन ऑफरनंतर आयडिया-व्होडाफोनच्या पोस्टपेड ग्राहकांना बिलांवर 50 टक्के सूट भेटू शकते. पूर्वी, कंपनीने प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजना सादर केल्या होत्या. 
 
जास्तीत जास्त कॅशबॅक 2400 रुपये 
आपल्याकडे देखील जर व्होडाफोन-आयडियाचा पोस्टपेड नंबर असेल मग ही सवलत सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर भेटेल. प्रत्यक्षात कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी सिटीबँकसह भागीदारी केली आहे. या अंतर्गत, व्होडाफोन आणि आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना त्यांच्या मासिक बिलावर 50 टक्के कॅशबॅक मिळू शकते. ऑफर अंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त 2,400 रुपये कॅशबॅक मिळेल. 
 
क्रेडिट कार्डसह भरणा केली जाईल
एका वर्षात 2400 रुपये कॅशबॅकच्या आधारावर आपल्याला 200 रुपये प्रति महिना कॅशबॅक मिळेल. व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना 200 रुपयेचा कॅशबॅक मिळविण्यासाठी सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरावे लागतील. व्होडाफोनच्या वेबसाइटवरून मायव्होडाफोन अॅप किंवा माय आयडिया अॅप डाउनलोड करून बिल भरले जाऊ शकतात.
 
या योजनेवर ऑफर नाही
जर आपण कंपनीची 299 रुपयांची पोस्टपेड योजना वापरत आहात, तर आपल्याला या ऑफरचा फायदा होणार नाही. कॅशबॅक मिळविण्यासाठी आपल्याकडे 399 व्होडाफोन रेड प्लॅन किंवा आयडियाची 399 रुपयांची पोस्टपेड योजना असावी. जर तुमचा प्लॅन 399 रुपयांची असेल तर तुम्हाला 200 रुपये कॅशबॅक मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे मिळणार

अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की कट? तपास जलदगतीने करण्यासाठी फडणवीस यांनी अमित शाह यांच्याकडे मदत मागितली

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

महाराष्ट्र सरकारचा मोठा उपक्रम; महिला कैद्यांसाठी खुल्या तुरुंग वसाहती, जिथे पात्र कैदी त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकतील

पुढील लेख
Show comments