Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंटरनेट स्लो असले तरी व्हिडिओ बघता येणार

Watch video with slow internet connection
यूट्यूबने काही महिन्यांपूर्वीच यूट्यूब गो या अॅपचे बीटा व्हर्जन जारी केले होते. मात्र आता हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
 
इंटरनेट नसेल किंवा वेग कमी असला तरी या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ पाहता येणार आहेत. हे अॅप 2016 मध्ये आयोजित केलेल्या मेड फॉर इंडिया कार्यक्रमात लाँच करण्यात आले होते. या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी कमी डेटा खर्च होतो.
 
व्हिडिओ ऑफलाइन बघण्यासाठी त्याचं पूर्वावलोकनही करता येणार आहे. तसेच डाउनलोड केलेले व्हिडिओ इंटरनल मेमरी किंवा एसडी कार्डमध्येही सेव्ह करता येतील.
 
तसेच ब्लूटूथनेद्वारे शेअरही करणे शक्य होणार आहे. वाय-फाय तंत्रज्ञानद्वारेही ते शेअर करता येतील. या अॅपची साइज 10 एमबीपेक्षा कमी असून ते अँड्रॉइडवर 4.2 किटकॅट किंवा त्याहून अधिक असलेल्या व्हर्जनवर सुरु होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बावखळेश्वर मंदिर, ट्रस्टचं ऑफिस जमीनदोस्त करा