Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नवीन : व्हॉटसअपचे बिझनेस ॲप लॉन्च

नवीन : व्हॉटसअपचे बिझनेस ॲप लॉन्च
, मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (16:50 IST)

व्हॉटसअपने नवीन व्हॉटसअप् बिझनेस ॲप लॉन्च केले.  यातून व्यावसायिकांना ग्राहकांशी सहजपणे संवाद आणि  संपर्क साधता येणार आहे. यात सध्याच्या व्हॉटसॲपच्या  लोगोत थोडासा बदल करुन ‘बी’ ॲड करण्यात आले आहे.  यामध्ये अशी काही फिचर्स आहेत जी सध्याच्या व्हॉटसॲपमध्ये उपलब्ध नाहीत. ॲन्ड्रॉईड फोनवर हे ॲप डाऊनलोड करता येते. 

सदरचे व्हॉटसॲप् इन्स्टॉल करताना जुन्या पद्धतीने नंबर रजिस्टर करावा लागतो. बिझनेस प्रोफाईल तयार करताना फोटो, पत्ता, बिझनेसबद्दल माहिती, संकेतस्थळ आणि इतर माहिती देता येते. सध्याच्या व्हॉटसॲप् अकाऊंटवरूनच नवीन व्हॉटसॲप सुरू करता येते.  या बिझनेस व्हॉटसॲपमध्ये ॲटो रिस्पॉन्स हे फिचर आहे. तसेच या ॲपमध्ये मेसेज शेड्युल लावण्याची सोय आहे. सेटींगमध्ये मेसेज शेड्युलचा पर्याय देण्यात आला आहे. वैयक्तिक आणि बिझनेस अशी दोन्ही ॲप्स एकाच फोनवर वापरता येतात. दोन्ही ॲप्ससाठी दोन वेगवेगळ्या नंबरवरुन रजिस्टर करावे लागेल. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण होती राणी पद्मावती