Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी अपडेटला स्थगिती

WhatsApp Delays New Privacy Policy by Three Months Amid Severe Criticism
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (10:56 IST)
WhatsApp ने नुकतीच त्यांच्या प्रायव्हसी अपडेट करण्याचा प्लान स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकची मालकी असलेली कंपनी व्हॉट्सअॅप कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे युजर्संना पॉलिसी संबंधी जाणून घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल. 
 
व्हॉट्सअॅप कंपनीनुसार लोकांमध्ये या अपडेटबाबत चुकीची माहिती जास्त पसरत असल्यामुळे कंपनीने प्रायव्हसी अपडेटला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपने म्हटले की आम्ही अपडेटची तारीख पुढे ढकलत आहोत. ८ फेब्रुवारीला कोणाचेही अकाउंट डिलीट किंवा सस्पेंड केले जाणार नाही. कंपनीने म्हटले की या प्रायव्हसी पॉलिसीबद्दल पसरलेल्या चुकीच्या माहीतीला आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
इंटरनेटवर व्हॉट्सअॅपच्या फेसबुकसोबत युजर्संची माहीती शेयर करण्यावरून वाद सुरू झाला होता. ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांच्या अटी व शर्थी सहमती कराव्या असे सांगण्यात आले होते.
 
प्रायव्हसी पॉलिसी अपडेट होणार यामुळे इतर चॅटिंग अॅप सिग्नल आणि टेलिग्राम यासारख्या प्रतिस्पर्धी अॅप डाउनलोड मध्ये मोठी वाढ पाहायला मिळात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन