इलेक्ट्रिक स्कूटरनंतर शाओमीने आता इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे. आपल्या यूपिन ब्रांडच्या अंतर्गत Himo Z16 (हिमो झेड १६) नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.
Xiaomi Youpin HIMO Z16 (शाओमी यूपिन हिमो झेड १६) तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम धातूचा वापर केला गेला आहे आणि या सायकलच्या मागील बाजूस स्विंगआर्म (swingarm) सस्पेंशन देण्यात आलं आहे. हे सस्पेंशन सामान्यत: माउंटन बाइक्स, मोपेड्स आणि मोटारसायकलींमध्ये आढळतं. शिवाय, Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकलचे वजन फक्त २२.५ किलो आहे. यात १६ इंचाची चाके आहेत आणि ही सायकल जास्तीत जास्त १०० किलो भार वाहू शकते.
Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकल फोल्डेबल आहे. म्हणजेच ती सहजपणे दुमडली जाऊ शकते. सायकल तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुमडली जाऊ शकते – हँडलबार, मध्यम फ्रेम, पेडल. त्यामध्ये मॅग्नेटिक क्लॅप्स आहेत जे सायकल जोडल्यावर पूर्णपणे चिकटल्या जातात, ज्यामुळे ती सहजतेने कुठेही घेऊन जाता येईल. इलेक्ट्रिक मोडमध्ये ५५ किलोमीटरपर्यंत चालते आणि पॉवर मोडमध्ये ८० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या सायकलचा वेग ताशी २५ किमी आहे. या इलेक्ट्रिक सायकलची किंमत $ ३५० आहे (सुमारे २७ हजार रुपये). ही सध्या चीनमध्ये उपलब्ध आहे.