भगवान श्रीकृष्ण यांना हिंदू धर्मात विष्णूंचे पूर्णावतार मानले गेले आहे. कृष्ण हे 16 कलांसह 64 विद्येत परिपूर्ण होते. ते युद्धात आणि प्रेमात दोन्ही गोष्टींमध्ये कुशल होते. त्यांचा बालपणीचे नाव कन्हैय्या असे. त्यांना लोकं कान्हा म्हणायचे. चला जाणून घेऊ या त्यांचा बालपणीच्या15 घटनांबद्दल. त्यांचे कृष्ण नाव ऋषी गर्ग यांनी ठेवले होते.
1 श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात रात्री झाला. तुरुंगातून बाहेर काढून त्यांचे वडील रात्रीच त्यांना गोकुळात नंदराय कडे सोडून आले.
2 गोकूळ आणि वृंदावनात असताना त्याने आपले संपूर्ण बालपण तेथेच घालवले. या दरम्यान त्यांनी कंसाने त्यांना ठार मारण्यासाठी पाठवलेल्या पुतणा, कागासूर, श्रीधर तांत्रिक, उत्कच, बकासुर, अघासुर, तृणासुर यांचे आपल्या मायेने वध केले.
3 गोकूळ आणि वृंदावनात असतांना त्यांनी आपल्या अनेक लीला रचल्या. सर्व गोपिकांनी माता यशोदेला कृष्णाने माती खाल्ल्याची तक्रार केल्या नंतर यशोदेने रागावून त्यांना तोंड उघडायला सांगितल्यावर यशोदेला त्यांचा तोंडात विश्व दिसू लागतातच यशोदा घाबरल्या.
4 लहानपणीच एकदा माता यशोदेने त्यांना उखळाने बांधले तेव्हा त्यांनी त्या उखळाला ओढत अंगणात नेले आणि अंगणातील दोन झाडांना उपटून काढले. त्या मधून दोन देव निघून कृष्णाला वंदन करून म्हणतात की आम्ही दोघे यक्ष कुबेराची मुले नंद कुबेर आणि मणीग्रीव आहोत. एका श्रापामुळे आम्ही झाडे बनलो होतो. आपल्या कृपेने आमची सुटका झाली.
5 लहान असताना सर्व ग्वालीन(गवळीन) त्यांना लोण्याचे आमिष दाखवून खूप नाचवायचा. असे म्हणतात की काही ग्वालीन(गवळीन) पूर्वी जन्मी खूप सिद्ध आणि तपस्वी असे. ज्यांनी कठोर तपश्चर्या करून श्रीहरीसह ममत्वाचं नातं मागितले असे. हेच कारण होत की सर्व ग्वालीन(गवळीन) त्यांना आई प्रमाणे प्रेम द्यायचा आणि त्यांचा सह नृत्य करायचा.
6 श्रीकृष्णाच्या बालपणीचे अनेक मित्र असे जसे मनसुखा, मधुमंगल, श्रीदामा, सुदामा, उद्धव, सुबाहू, सुबल, भद्र, सुभद्र, मणिभद्र, भोज, तोककृष्ण, वरूठप, मधूकंड, विशाल, रसाळ, मकरंद, सदानंद,चंद्रहास, बकुळ,शारद, बुद्धिप्रकाश इत्यादी. बालपणी हे सर्व गोकूळ आणि वृंदावनाच्या रस्त्यावर लोणी चोरायचे आणि धुडगूस करायचे . बाळसखीनं मध्ये चंद्रावली, श्यामा, शैव्या,पद्मा, राधा, ललिता, विशाखा आणि भद्रा यांचे नाव घेतले जाते.
7 श्रीकृष्णाला एकदा माता यशोदा ग्वालीन (गवळीन)च्या तक्रारी वरून एका अंधाऱ्या खोलीत कैद करतात तिथे कृष्णाच्या लीलेमुळे एक मोठा साप निघून येतो. तेव्हा यशोदा म्हणतात की बाळा इथे मोठा साप आहे तू इथून निघून जा. तेव्हा कान्हा म्हणतात की नाही, मी सापासमोर माझ्या आईला सोडून कसा काय पळून जाऊ ? हे ऐकून यशोदेला गहिवरून येत. नंतर कृष्णाच्या खुनावाणी साप त्यांना नमस्कार करून तिथून निघून जातो.
8 धनवा नावाचा एक बासरी विकणारा श्रीकृष्णाला बासरी देतो तर ते त्यावर प्रथमच गोड सूर ठेवतात. ते ऐकल्यावर बासरी विकणारा मोहक होऊन जातो. त्या वेळेपासून श्रीकृष्ण बासरी वाजविणारे बनले. त्यांचा बासरीच्या सुरात सर्व गोपिका आणि पूर्ण गोकूळ बेभान होऊन जातं.
9 श्रीकृष्ण आणि राधाची भेट तेव्हा होते ज्यावेळी राधाचे वडील वृषभानू बरसण्यातून त्यांचा घरी फाग महोत्सवाच्या आयोजनासाठीची विचार मंत्रणा करण्यासाठी आले होते. काही लोकं म्हणतात की राधाने श्रीकृष्णाला पहिल्यांदा त्यावेळी बघितले जेव्हा ते उखळाने बांधलेले होते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार श्रीकृष्ण आणि राधेची भेट गोकूळ आणि बरसाणाच्या मधील झालेल्या फाग उत्सवाच्या दरम्यान झाली होती आणि दोघांमध्ये प्रेम झाले होते.
10 अशी आख्यायिका आहे की एकदा श्रीकृष्णाने एका फळ विकणार्याह बाई कडून सर्व फळ विकत घेतले आणि त्याचा मोबदल्यात तिला मूठभर धान्य दिले असे. फळवाली समाधानी होऊन घरी जाते तिथे गेल्यावर आपल्या झोळणी मधील बांधलेले धान्याला काढताच त्यामधून हिरे माणिक निघतात.
11 असे म्हणतात की एकदा अधिकमासात आई कात्यायिनीचे व्रत कैवल्य आणि पूजा करण्यासाठी गावातील काही ग्वालीन(गवळीन) गावाच्या बाहेर यमुनेच्या काठी असलेल्या देऊळात जातात आणि निर्वस्त्र होऊन यमुनेत अंघोळ करीत असताना श्रीकृष्ण आपल्या मित्रांसह तेथे जाऊन नदीकाठी ठेवलेले त्यांचे कपडे घेऊन झाडावर चढून बसतात. गवळींना हे कळल्यावर त्या झाडावर चढलेल्या श्रीकृष्णाला कपडे देण्याची विनवणी करतात या वर श्रीकृष्ण म्हणतात की आपण अश्या प्रकारे यमुनेत निर्वस्त्र होऊन त्यांचा अपमान केला आहे. आता तर हे कापडं तुमच्या पतींसमोरच परत मिळतील. आपल्याला यमुनेत अश्या अवस्थेत स्नान करायला नको होतं. त्यावर त्यांचा मित्र मनसुखा म्हणतो की वचन द्या की या पुढं आमची कोणतीही तक्रार आमच्या मातेकडे करणार नाही. त्या सर्व जणी वचन देतात. श्रीकृष्ण आपल्या मित्रांसह त्यांना त्यांचे वस्त्र देऊन निघून जातात.
12 एकदा श्रीकृष्णाच्या लीलेने त्यांचा चेंडू खेळत असताना यमुनेत कालिया देह नावाच्या जागेवर पाण्यात बुडून जातो तेव्हा ते तो चेंडू घेण्यासाठी पाण्यात उडी टाकतात तर एक मित्र त्यांना सांगतो की तिथे कालिया नाग आहे तर आपण जाऊ नये. तो आपणास भस्मसात करेल,परंतु श्रीकृष्ण त्याचे काहीही न ऐकता पाण्यात उडी टाकतात आणि पाण्यातच ते कालिया नागाला दडपतात आणि त्याला यमुनेच्या वाटेने समुद्राच्या मध्यभागी असलेल्या रमणक बेटावर जाण्याची आज्ञा देत आपला चेंडू परत आणतात.
13 श्रीकृष्णाने बालपणीच गोकूळ आणि वृंदावनात इंद्रदेवाची पूजा आणि इंद्रोत्सव हे सांगून बंद करवून देतात की इंद्रदेव अहंकारी देव असे आणि हे न्यायाधीश नाही. त्याच वेळी कृष्ण आणि बलरामांचे तूळदान केले जाते तेव्हा एका तुळात श्रीकृष्णाला बसवतात आणि दुसऱ्या तुळात हिरे आणि रत्न ठेवले जाते. पण श्रीकृष्णाच्या वजनाने त्यांचा तूळ वजनी असतो. तेव्हा नंदजी यशोदेला म्हणतात की एक पिशवी अजून आणा. राधा आणि श्रीकृष्ण स्मितहास्य करीत असतात. बऱ्याच पिशव्या ठेवून देखील काहीच होतं नाही हे बघून हळूच राधे जवळ जाऊन त्यांना वंदन करतात. राधेला ते समजल्यावर ती आपल्या केसांच्या वेणीमधून फुलं काढून देते. दाऊ ते फुलं घेऊन तूळ च्या दुसऱ्या भागी ठेवतात दुसरा भाग खाली वाकून जातो. श्रीकृष्ण बसलेला भाग उंच होतो. सर्व आनंदी होतात.
14 इंद्रोत्सव बंद केल्यामुळे इंद्र रागावून जातात आणि ते सावर्तकाला सांगून गोकूळ आणि वृंदावनात पूर आणावयास सांगतात. अश्या परिस्थितीत श्रीकृष्ण सर्व गावकरींना वाचविण्यासाठी आपल्या लहान बोटावर संपूर्ण गोवर्धन डोंगर उचलतात आणि सर्व गावकरींना त्याखाली येण्यास सांगतात. हे बघून इंद्रदेव आणि इतर देव आश्चर्य करतात. नंतर इंद्र त्यांचा शरणी जाऊन आपली हार पत्करतात. तेव्हा पासून गोवर्धन पूजेची सुरुवात करण्यात आली.
15 अश्या प्रकारे श्रीकृष्णाने बालपणी अनेक प्रकारच्या लीला केल्या आहेत शेवटी मथुरेला जाण्यापूर्वी श्रीकृष्ण राधा आणि त्याच्या मैत्रिणींसह शेवटचा महारास खेळतात. या महारासाची चर्चा पुराणांच्या व्यतिरिक्त भक्तिकाळातील बऱ्याच कवींनी केलेली आहे. मथुरा गेल्यावर ते एका कुब्जेची सुटका करतात नंतर शिव धनुष्य मोडतात आणि शेवटी कंसाला ठार मारतात. नंतर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात अभ्यासासाठी जातात .कंसाला ठार मारल्यानंतर त्यांची बाळ लीला संपते.