Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्रीकृष्णाचे 6 प्रिय मंत्र, वाचा अर्थासहित

श्रीकृष्णाचे 6 प्रिय मंत्र, वाचा अर्थासहित
श्री कृष्ण जन्माष्टमी पवित्र मंत्र
 
श्री कृष्ण पूजनाचे प्रत्येक शास्त्रात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे जाणून घ्या 6 विशेष मंत्र. या माध्यमाने जाणून घ्या कृष्णात मन रमवण्याने आणि कृष्ण आराधना केल्याने काय प्राप्त होतं ते...
 
श्री शुकदेव राजा परीक्षित् यांना म्हणतात-
 
1. सकृन्मनः कृष्णापदारविन्दयोर्निवेशितं तद्गुणरागि यैरिह।
न ते यमं पाशभृतश्च तद्भटान्‌ स्वप्नेऽपि पश्यन्ति हि चीर्णनिष्कृताः॥
जी व्यक्ती केवळ एकदा श्रीकृष्णाच्या गुणांमध्ये प्रेम करणार्‍या आपल्या चित्ताला श्रीकृष्णाच्या चरण कमळात अर्पित करतात, ती पापांपासून मुक्त होतात. मग त्यांना हातात पाश घेतलेल्या यमदूताचे दर्शन स्वप्नात देखील होत नाही.
 
2. अविस्मृतिः कृष्णपदारविन्दयोः
क्षिणोत्यभद्रणि शमं तनोति च।
सत्वस्य शुद्धिं परमात्मभक्तिं
ज्ञानं च विज्ञानविरागयुक्तम्‌॥
श्रीकृष्णाच्या चरणांचा सदा स्मरण राहावे, त्यानेच पापांचा नाश, कल्याणाची प्राप्ती, अन्तः करणाची शुद्धी, परमात्म्याची भक्ती आणि वैराग्ययुक्त ज्ञान-विज्ञानाची प्राप्ती आपोआप होते.
 
3. पुंसां कलिकृतान्दोषान्द्रव्यदेशात्मसंभवान्‌।
सर्वान्हरित चित्तस्थो भगवान्पुरुषोत्तमः॥
प्रभू पुरुषोत्तम श्रीकृष्ण जेव्हा चित्तात विराजित होतात, तेव्हा त्यांच्या प्रभावामुळे कलियुगाचे सर्व पाप आणि द्रव्य, देश आणि आत्म्याचे दोष नष्ट होऊन जातात.
 
4. शय्यासनाटनालाप्रीडास्नानादिकर्मसु।
न विदुः सन्तमात्मानं वृष्णयः कृष्णचेतसः॥
श्रीकृष्णाला आपलं सर्वस्व समजणारे भक्त श्रीकृष्णामध्ये इतके तन्मय राहतात की झोपताना, बसताना, फिरताना, बोलताना, खेळताना, स्नान करताना आणि भोजनासह इतर कोणतेही काम करताना त्यांना स्वत:ची सुध नसते.
 
5. वैरेण यं नृपतयः शिशुपालपौण्ड्र-
शाल्वादयो गतिविलासविलोकनाद्यैः।
ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ
तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम्‌॥
जेव्हा शिशुपाल, शाल्व आणि पौण्ड्रक इतर राजा बैरभावाने खाताना, पिताना, झोपताना, उठताना, बसताना प्रत्येक वेळी श्री हरिची चाल, त्यांच्या चितवन व इतर चिंतन करण्यामुळे मुक्त होऊन गेले, मग तर ज्याचं चित्त श्री कृष्णात अनन्य भावाने लागत आहे, त्या विरक्त भक्तांच्या मुक्त होण्यात शंका कसली?
 
6. एनः पूर्वकृतं यत्तद्राजानः कृष्णवैरिणः।
जहुस्त्वन्ते तदात्मानः कीटः पेशस्कृतो यथा॥
श्रीकृष्णाशी द्वेष करणारे सर्व नरपतिगण शेवटी प्रभू स्मरणाच्या प्रभावामुळे पूर्व संचित पापांना नष्ट करत तसेच भगवद्रूप होतात जसे पेशस्कृतच्या ध्यानाने किडा तद्रूप होतो, म्हणून श्रीकृष्णाचे सदैव स्मरण असावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जन्माष्टमी 2021 विशेष :भगवान श्रीकृष्णाच्या या चार गोष्टी अवलंबवून आपले आयुष्य यशस्वी बनवा