जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला विशेष नैवदे्य दाखवून प्रसन्न करता येऊ शकतं.
श्रीकृष्णाला पांढरी मिठाई, साबुदाण्याची खीर याचा नैवदे्य दाखवावा. यात साखर टाकण्याऐवजी खडीसाखर मिसळावी. आणि नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान ठेवावं. याने श्री कृष्णाच्या कृपेमुळे ऐश्वर्य प्राप्तीचे योग बनतात.
या व्यतिरिक्त लोणी, पंजीरी, लाडू, इमरती, मोहन भोग, सोहन हलवा, पंचामृत, घेवर, ड्रायफ्रूट शिरा आणि खोपरापाक देखील नैवेद्य म्हणून दाखवता येईल.
त्व देवां वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयेति!!
या मंत्रासह कृष्णाला नैवेद्य दाखवावा.
नैवेद्यासाठी माखन मिश्री म्हणजे लोणी-खडीसाखर, दूध, तूप, दही आणि मेवा अत्यंत महत्त्वाचे पदार्थ मानले गेले आहे. म्हणून प्रसाद तयार करताना हे पदार्थ नक्की वापरावे.
पूजेत पाच फळांचा नैवेद्य देखील लावावा. कृष्णाला दूध-दही अत्यंत आवडीचे होते म्हणून प्रसादात दूध, दही आणि लोणी सामील करण्याचं महत्त्व आहे.