Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच्या प्रचाराची कमान पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात

Webdunia
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (09:47 IST)
झारखंड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराची कमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असणार आहे. तसेच यासंदर्भात मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय मंत्री बी.एल.संतोष यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि निवडणूक व्यवस्थापन पथकाची बैठक घेतली. तिकीट वाटपावरुन असंतुष्ट असलेल्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यातील असंतोष दूर केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या प्रत्येक विभागात पंतप्रधान मोदींची निवडणूक सभा घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. झारखंडमध्ये पाच विभाग असून संघटनात्मक दृष्टिकोनातून पक्षाने राज्याची सहा विभागांमध्ये विभागणी केली आहे.  
 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीने निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्याचे पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पक्षाचे प्रमुख चेहरे आणि रणनीतीकार असल्याचे पक्षाचे नेते सांगतात. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पद्मश्री डॉ. सुब्बान्ना अय्यप्पन मृतावस्थेत आढळले, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ 6 दिवसांपासून बेपत्ता होते

नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ५ मृतदेह आढळले

LIVE: महाराष्ट्र दहावी बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान १५ लाख सायबर हल्ले, महाराष्ट्र सेलने हल्ले उधळले

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी तळ उद्ध्वस्त, सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक

पुढील लेख
Show comments