प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामातील (PKL) 88 वा सामना यूपी योद्धा आणि पाटणा पायरेट्स यांच्यात खेळला जाईल. उभय संघांमधील हा सामना 2 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे.
यूपी योद्धाच्या संघाने आतापर्यंत 15 सामने खेळले असून यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. त्यांचे 3 सामने बरोबरीत संपले आणि ते 41 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. यूपी योद्धाने त्यांचे शेवटचे तीन सामने गमावले आहेत आणि त्यांच्यासाठी विजय मिळवणे खूप महत्वाचे आहे. दुसरीकडे पटना पायरेट्सने 13 पैकी 8 सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत झाला आहे. त्यांना 4 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत ते 45 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना शेवटच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
यूपी योद्धा संघ -परदीप नरवाल, नितेश कुमार, सुरेंदर गिल, श्रीकांत जाधव, सुमित, आशु सिंग आणि शुभम कुमार.
पाटणा पायरेट्स संघ -नीरज कुमार, सचिन तंवर, मोहम्मदरेझा चियानेह, मोनू गोयत, प्रशांत कुमार राय, सुनील आणि सी सजिन.