कारगिलच्या युद्धाला 21 वर्षे झाली आहेत. भारतीय सैन्याने कारगिलवर विजय मिळवून आपला देशाचा झेंडा फडकवला. वर्ष 1999, कारगिलच्या उंच शिखरांवर घात लावून बसलेल्या पाक सैनिकांना जरा देखील अंदाजा नव्हता की त्यांच्यावर आकाशातून देखील आक्रमण होऊ शकतो. भारतीय वासुसेनेच्या मिग 27 लढाऊ विमानांनी आकाशातून पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. वायुसेनेच्या या शूरवीराने पाक सैन्याच्या पुरवठा आणि पोस्टवर इतकी अचूक आणि घातक असे बॉम्बं टाकले की त्यांचे पायच उखडले.
1700 किमी प्रति तासाच्या वेगाची क्षमता असलेले आणि जमिनीवर अचूक हल्ला करण्यात सक्षम असलेले या रशियन लढाऊ विमानांना कारगिल युद्धात पराक्रम दाखविण्यासाठी 'बहादूर' असे नाव दिले. त्याची भीती पाकिस्तानच्या डोक्यात आणि मनात अशी शिरली की त्यांनी त्याचे नाव 'चेटकीण' असे ठेवले.
जेव्हा हे विमान जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळून उड्डाण भरत होते त्यावेळी कोणतेही रडार ह्याला सहसा ओळखू शकत नव्हते. याची आवाज तर शत्रूंच्या मनात भीती निर्माण करायची. तरी भारतीय वायुसेनेने आपल्या 38 वर्षाच्या कालावधीत या लढाऊ विमानांनी बरेच चढ-उतार बघितले आहे.
मिग-27 च्या या शेवटच्या आणि प्रगत ताफ्यावर वायुसेनेच्या लढाऊ तुकडीला वर्ष 2006 पासूनच अभिमान असे. मिग-23 बीएन, मिग-23 एमएफ आणि प्योर मिग-27 सारख्या लढाऊ विमान आधीपासूनच सेवेबाहेर गेले आहेत.
या विमानाने शांती आणि युद्धाच्या दरम्यान दोन्ही काळात देशाला मोठे योगदान दिले आहे. तोफ्याने कारगिल युद्धाच्या दरम्यान एक महत्त्वाचे योगदान देताना शत्रूंच्या ठिकण्यांवर अचूकतेने रॉकेट आणि बॉम्बं हल्ले केले होते.
हवेतून जमिनीवर अचूक निशाणा लावण्यात पारंगत होते हे..
मिग आपल्या काळातले सर्वात सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान होते. हे हवेतून जमिनीवर लक्ष लावण्यास इतके हुशार होते की शत्रूला काही समजण्याच्या आतच हे त्यांना उद्ध्वस्त करायचे. हे फायटर जेट 1700 किमी प्रति तासाच्या वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम होते. या व्यतिरिक्त हे 4000 की ग्रॅमच्या वॉरहेड ला नेऊ शकत होते.