राजूला कुत्रा घेऊन फिरताना बघून मनूने विचारले,
'तुझा कुत्रा चावतो का?' राजूला म्हणाला,
'छे! अजिबात नाही.'
मनूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला.
'आई ग ! करीत मनू राजूला म्हणाला, 'तू काय म्हणाला,
तुझा कुत्रा चावत नाही!'
राजू उत्तरला, 'पण, हा माझा कुत्रा नाही!