Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीदींना फक्त संगीताची नाही तर महागड्या गाड्यांची देखील होती आवड

/lata mangeshkar
, सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (08:18 IST)
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झालं. दीदी त्यांची कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवून गेल्या आहेत. दीदींना फक्त संगीताची नाही तर महागड्या गाड्यांची देखील आवड होती. एका रिपोर्टनुसार दीदींना वयाच्या 13 व्या वर्षी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांची पहिली कमाई फक्त 25 रूपये होती. आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 370 कोटी रूपयांची संपत्ती आहे.
 
एवढंच नाही तर त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. फारपूर्वी दीदींनी एका मुलाखतीत गाड्यांवर असलेलं त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. त्यांनी सर्व प्रथम Chevrolet गाडी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी Buick आणि Chrysler या दोन गाड्या खरेदी केल्या. यश चोप्रा यांनी लतादीदींना एक मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती. दीदींनी सांगितलं, ‘दिवंगत यश चोप्रा मला लहान बहिण मानायचे. वीरझारा’ सिनेमाच्या म्युझीक प्रदर्शनादिवशी त्यांनी मला मर्सिडीज कारची चावी माझ्या हातात दिली आणि तुमच्यासाठी भेट वस्तू असल्याचं सांगितलं… त्यांनी दिलेली कार आजही माझ्याकडे आहे… ‘

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ती आम्हाला सोडून गेली', अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकरांसाठी ब्लॉग लिहिला