Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परभणी लोकसभा निवडणूक 2019

Parbhani lok sabha election result 2019
Webdunia
मुख्य लढत : संजय जाधव (शिवसेना) विरुद्ध राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
 
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीमध्ये विद्यमान संजय जाधव यांना पुन्हा एकदा मैदानात उतरविण्यात आले आहे. संजय जाधव हे कट्टर शिवसैनिक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना उमेदवारी देऊन शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. ते गंगाखेड बाजार समितीचे पाच वर्षे सभापती होते. दहा वर्षांपासून ते सोनपेठ बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांचे वडील उत्तमराव विटेकर हे १९७८  मध्ये समाजवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात. स्वतः विटेकर हे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.सध्या त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेत इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या

नाशिक: जिंदाल प्लांटमध्ये भीषण आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान

LIVE: कोकण किनाऱ्यावर मुसळधार पाऊस

फडणवीस मंत्रिमंडळात प्रवेशानंतर छगन भुजबळ यांना नाशिकची कमान मिळणार का?

पाकिस्तानच्या १५,००० रुपयांच्या ड्रोनवर १५ लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले-काँग्रेस नेत्याचा दावा, फडणवीस म्हणाले- मूर्खांना काय बोलावे...

पुढील लेख
Show comments