Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारामती लोकसभा निवडणूक 2019

Webdunia
मुख्य लढत : कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
 
कांचन यांचे पती राहुल कुल हे याच मतदारसंघातील दौंडचे आमदार आहेत. कांचन यांच्या सासूबाई आणि सासरेदेखील आमदार होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या त्या जवळच्या नातेवाईक आहेत. खडकवासलाचे  भाजप आमदार भीमराव तापकीर आणि शिवसेनेचे विजय शिवतारे (राज्यमंत्री) यांनी आपली ताकद कुल यांच्या पाठीशी उभी केली आहे. सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे या भागातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेस आमदार संग्राम अनंतराव थोपटे हेही सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे आहेत.सुप्रिया यांचे बंधू अजित पवार बारामतीचे आमदार आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळी झाडली

विवाहित प्रेयसीचे 30 तुकडे करुन फ्रीजमध्ये लपवले ! भयानक घटनेचे सत्य समोर आले

मार्क्सवादीनेते अनुरा कुमार दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

रिया सिंघा मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची विजेती बनली

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 124 कोकेन कॅप्सूल गिळलेल्या ब्राझीलच्या महिलेला अटक

पुढील लेख
Show comments