Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन, युतीकडे राष्ट्रवादाचा मुद्दा – देवेद्र फडणवीस

विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन, युतीकडे राष्ट्रवादाचा मुद्दा –  देवेद्र फडणवीस
, सोमवार, 18 मार्च 2019 (08:37 IST)
गेल्या 30 वर्षांपासून आमची युती आहे. ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है  असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेना आणि भाजपला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा धागा बांधून ठेवते तर आम्ही युती केली तेव्हा शिवसेना-भाजपा दोघे मिळून एकत्र कार्यकर्ता मेळावा घेणार आहोत हे ठरले होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र भाजप-शिवसेनेचा संयुक्त मनोमिलन मेळाव्यात आपले मत व्यक्त केले.
 
युती झाली आणि युतीच्या हुंकाराने विरोधक पुरते गांगरले आहेत. कार्यकर्त्याचा मेळावे झाल्यावर महायुतीची 24 तारखेला पहिली सभा होणार आहे. आमची युती 30 वर्षांपासून असून, ‘ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है’असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकायच्याच असा निर्धार कार्यकर्त्यांना समोर व्यक्त केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने व राज्यातील युती  सरकारने जनसामान्यांसाठी मोठी  कामे केली आहेत सोबतच अनेक योजना राबल्या असून यामध्ये हागणदारी मुक्त योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान योजनेचाही उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन
 
देशात 22 पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आणि सर्व बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र हात वर करून ‘हम साथ साथ है’च्या घोषणा देखील  केल्य. मात्र त्या जागेवरून बाहेर पडताच सपा-बसपाने काँग्रेसला म्हटले ‘हम आपके है कौन’आणि काँग्रेसने दिल्लीमध्ये आपला म्हटलं ‘हम आपके कौन है’.आता हे सार्व एकमेकांना कसे पराभूत करता येईल यासाठी काम सुरु केले आहे. या सर्व एकत्र आलेल्या विरोधकांचे महागठबंधन नाही तर महाठगबंधन असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. आमची युती नसून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी लढण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आजोबांनी केला प्रचाराला सुरुवात