Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज म्हणाले हा तो माझ्यावर अन्याय

Harishchandra Chavan
, शनिवार, 23 मार्च 2019 (10:03 IST)
सध्या भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे पक्ष कमालीचा खुश आहे. मात्र या नवीन येणाऱ्यान मुळे भाजपचे खरे आणि जुने नेते आता नाराज होताना दिसत आहेत. असाच प्रकार आता दिंडोरी लोकसभा मतदार संघात घडला आहे. तीनदा निवडून आलेले खासदार आता नाराज आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे. मागील वेळी २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र लोकसभेच्या निवडणूक काळात पवार यांना प्रवेश दिल्याने आणि त्या खासदारकीसाठी इच्छुक असल्याने भाजपाचे विद्यमान  खासदार हरीश्चंद्र चव्हाण  नाराज झाले आहेत. भारती पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. खासदार म्हणून दिंडोरी येथून  हॅट्रीक केली आहे. तर चव्हाण यांचे नाव पहिल्या यादीत असेल असे सर्वाना वाटत होते, गेल्या २०१४ साली मोदी लाटेत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि भारती पवार यांची तिकीट मिळेल अशी आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपाच्या उमेदवार चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार हरीश्चंद्र चव्हाण वेटींगवर आहेत. त्यातच भारती पवार यांना आज मुंबईत भाजपा प्रवेश केला आहे. त्यामुळे चव्हाण यांची उमेदवारी संकटात सापडली आहे. त्यापार्श्वभूमीवर चव्हाण यांची नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक घेतली आहे.
 
चव्हाण म्हणाले की भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय होईल. पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही प्रकारे विश्वासात घेतले नाही आणि विचारणा झाली नाही. माझ्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही परंतु माझा विचार पक्ष करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भाजपा पवार यांना उमेदवारी देणार की पुन्हा चव्हाण यांना संधी देणार हे दिल्लीतून ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहावीच्या विद्यार्थ्यांने आय सी यु मध्ये बसून दिला पेपर