आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी २३ मे नंतर काय करायचं? याचे पत्ते उघड केलेले नाहीत. जगनमोहन रेड्डी यांच्याशी सुद्धा शरद पवार यांनी टेलिफोनद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तुर्तास तरी त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबतचे वृत्त डेक्कन क्रोनिकल या वेबसाईटने दिले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी कोणत्याही एका बाजुला न वळता निकालापर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतलेला आहे.
एक्झिट पोलनुसार वायएसआर यांना आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेत जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर रेड्डी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.