Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिसांना सलाम अविरत न थकता ३० तासांपेक्षा अधिक वेळ ठेवला बंदोबस्त

More than 30 hours of settlement
, मंगळवार, 30 एप्रिल 2019 (09:15 IST)
पूर्ण देशाचे लक्ष असलेल्या मुंबईतमध्ये सहाही लोकसभा मतदारसंघांत एकही अनुचित घटना घडली नाही. तर निर्विघ्नपणे मतदान पार पडले आहे. मार त्यासाठी पोलिस प्रशासन अविरत न थकता ३० तासांहून अधिक काळ बंदोबस्तासाठी पूर्ण वेळ तैनात होते. विशेष म्हणजे सध्या राज्यात उष्णतेची लाट आहे, रखरखते ऊन आणि घामाच्या धारा वाहत असताना मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे. यासाठी घडणाऱ्या प्रत्येक घटना-घडामोडीवर हे पोलिस अधिकारी- कर्मचारी  बारकाईने लक्ष ठेवून होते. मतदानाचा आगोदरच्या दिवशी रविवारी सन्ध्याकाळी शहर व उपनगरातील मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात केले होते. तर सोमवारी रात्री मतदान केंद्रांवरून सील केलेले व्होटिंग मशीन्स रवाना केल्यावर रात्री उशिरा बंदोबस्त मागे घेतला गेला आहे. मुंबई पोलिसांसह केंद्रीय राखीव दलाच्या १४ व राज्य राखीव दलाच्या १२ कंपन्या आणि होमगार्डसह एकूण ४० हजारांहून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलीस आयुक्त संजय बर्वे स्वत: निवडणूक बंदोबस्तावर लक्ष ठेवले तर काही ठिकाणी घडलेल्या किरकोळ वादाच्या घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने पोलिसांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे. लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात मुंबईच्या सहाही मतदारसंघांचा समावेश होता. त्यामुळे सोशल मिडीयावर नागरिक पोलिसांना धन्यवाद देखील करत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंडोनेशियात निवडणुकीच्या कामाच्या ओझ्यामुळे 272 कर्मचाऱ्यांचा मृत्यू