Marathi Biodata Maker
✕

मुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा केला प्रचार

Webdunia
गुरूवार, 18 एप्रिल 2019 (17:20 IST)
देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार केला असून, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिलाय. याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला असून, मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगितले आहे. देवरा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यामान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे. देवरा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत अंबानी म्हणतात, ‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’ विशेष म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी स्वतः खूप कमी वेळा राजकीय भाष्य केले असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अंबानींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा होता आता मात्र त्यांनी कॉंग्रेसच्या  देवरा यांना पाठिंबा दिल्याने जोरदार राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

फटाके फोडण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; नागरिकांनी कोणत्या नियमांची नोंद घ्यावी?

LIVE: नागपूरमध्ये काँग्रेसने 'व्होट बचाओ, देश बचाओ' अभियानांतर्गत बाईक रॅली काढली

आर्यना सबालेन्का आणि पेगुलाचे आव्हान संपले, गुओ हान्यू वुहानच्या १६ च्या फेरीत

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला

अमेरिकेने युक्रेनला दुहेरी धक्का दिला! मस्कच्या कंपनीने इंटरनेटचा वेग कमी केला

पुढील लेख
Show comments