Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चौकीदाराने निभावली ड्यूटी, या 8 कारणांमुळे आली मोदींची त्सुनामी

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (15:56 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक 2019 मध्ये एनडीएची त्सुनामी आली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये जेथे भगवा लाट दिसत आहे तेथेच पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक मध्ये देखील वातावरण भाजपमय झाले आहे. जाणून घ्या या निवडणुकीत 8 विशेष गोष्टी ज्यामुळे वातावरण भाजपच्या पक्षात झाले:
   
मोदी फॅक्टर : 2019 लोकसभा निवडणूक मोदींच्या नावाखाली झाल्याचे मानले जातील. ते केवळ निवडणुकीचा मोठा चेहराच नव्हे तर सर्वात मोठा मुद्दा देखील होते. लोकांनी मत देखील मोदींच्या नावानेच दिले. मोदींनी देशभरात फिरून वातावरण पक्षाकडे वळवले. विपक्ष या अंडरकरंटाचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलं. या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांनी स्थानिक उमेदवाराला महत्त्व न देता मोदींचा चेहरा समोर ठेवला.
 
राष्ट्रवाद : नरेंद्र मोदींनी देशात विकास कार्य तर खूप करवले परंतू निवडणुकीत राष्‍ट्रवाद हा मुद्दा उचलण्यात आला. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये हा मुद्दा प्रभावी ठरला. लोकांना मोदीची गोष्ट समजण्यात आली आणि राष्ट्रवादाच्या नावावर एनडीए आणि भाजप उमेदवारांच्या पक्षात जोरदार मतदान झाले.
 
बालाकोट सर्जिकल स्ट्राइक : मोदी राज असताना पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकला देखील मतदान करून लोकांनी कौतुक केले. मोदींनी ज्या प्रकारे पाकिस्तान स्थि‍त दहशतवाद्यांकडून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, लोकं त्यांच्या शैलीचे गुणगान करू लागले. एवढेच नव्हे तर मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली.
 
मोदींचा आक्रमक प्रचार : नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत अत्यंत आक्रमकप्रकारे प्रचार केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासमोर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस नेता ममता बनर्जी यांच्यासह सर्व नेता फिके दिसू लागले. त्यांनी विपक्षाला प्रत्युत्तर दिले. त्यांच्या आक्रमक निवडणूक योजनेमुळे विपक्षाला पराभूत होण्यासाठी भाग पाडले. शेवटल्या फेरीतील प्रचारात मोदींनी 'चौकीदार चोर' च्या प्रत्युत्तरात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टोळा मारत त्यांच्या नावावर आव्हान देणे सुरू केले होते.
 
हिंदुत्व : या निवडणुकीत हिंदुत्व एकदा पुन्हा मोठा मुद्दा सिद्ध झाला. पश्चिम बंगालमध्ये भाजप रॅलीत जोरदार राम नावाचे जल्लोष करण्यात आले. पश्चिम बंगालसह उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये देखील या मुद्द्यावर जोर होता. पक्षाकडून उन्नावहून साक्षी महाराज, सीकरहून स्वामी सुमेधानंद सरस्वती आणि अलवरहून बाबा बालकनाथ यांना तिकिट देण्यात आले. साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देऊन भाजपने आपल्या पक्षात मतांचे यशस्वीरीत्या धुव्रीकरण केले. तसं तर काही प्रकरणांमध्ये साध्वी यांनी पक्षाची नाचक्की देखील केली.
 
एनडीएची एकता : यावेळी एनडीए पूर्वीपेक्षा अधिक संघटित दिसलं. उद्धव ठाकरे यांना भाजपने यशस्वीरीत्या आपलंसं केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नामांकनावेळी प्रकाशसिंह बादल, उद्धव ठाकरे, नीतीश कुमार सारख्या दिग्गजांची उपस्थितीत संघटित असल्याचे संकेत देत होतं. मोदींनी सहयोगी पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थनात देखील सभा करण्यात पुढचा मागचा विचार केला नाही. आणि आवश्यकतेप्रमाणे या दिग्गज लोकांना भाजपच्या प्रचारामध्ये सामील करण्यात आले. हेच कारण आहे की एनडीएने बिहार आणि महाराष्ट्रात चांगले प्रदर्शन केले.
 
सोशल मीडिया : सोशल मीडियावर देखील भाजपचा निवडणूक प्रचार आक्रमक होता. राहुल यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत 'मैं भी चौकीदार' कँपेन चालवले गेले. बघता बघता भाजपचे दिग्गज नेते आणि मोदी भक्तांनी देखील सोशल मीडियावर मैं भी चौकीदार लिहिणे सुरू केले. मग काय, प्रशासकांसह सामान्य लोकांमध्ये देखील मोदींच्या या अभियानाशी जुळण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. भाजपने हॅशटॅग्सचा देखील पुरेपूर वापर करून फायदा करून घेतला.
 
निवडणूक प्रबंधन : भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे उत्तम प्रबंधन देखील पक्षाच्या मोठी विजयाचे महत्त्वाचे कारण आहे. पक्षाच्या शीर्ष नेत्यांमध्ये कमालीचे समन्वय जाणवत होते. जेथे मोदी तेथे अमित शहा नव्हते तर जेथे शहा गेले तेथे मोदींनी बघण्याचा विचार देखील केला नाही. पूर्ण निवडणुकीत केवळ मध्यप्रदेशातील उज्जैन अपवाद ठरलं. या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसून आला. त्यांचा प्रचार देखील विस्कटल्यासारखं जाणवत होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सायबर पोलिसांची ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट BookMyShow ला नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण

देवेंद्र फडणवीसांचे कुत्रे भुंकतात, सदाभाऊ शरद पवारांवर काय म्हणाले, संजय राऊत भडकले

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर मोठे वक्तव्य, संविधानाबाबत मोठी गोष्ट बोलले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल ओवेसींचे मोठे वक्तव्य, सरकारकडून मागितले उत्तर

भारत दहशतवादमुक्त करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध, अमित शहांचा दावा

पुढील लेख
Show comments