Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजोग वाघेरे यांचा राजीनामा

sanjog vaghore
Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (18:14 IST)
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांचा पराभव होताच राजकीय उलथा-पालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.
 
मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता अख्खे पवार कुटुंबिय पार्थ यांच्या प्रचारासाठी मावळात तळ ठोकून होते. अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्क्याने पार्थ यांचा पराभव केला.
 
पार्थ यांच्या पराभवाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. संजोग वाघेरे म्हणाले की, इतका दुर्देवी पराभव होईल, असे वाटले नाही. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. काम करुनही मिळालेले अपयश धक्कादायक आहे. इतका दारुण पराभव होईल, असे वाटत नाही. आजचा निकाल आश्चर्यकारक आहे. इव्हीएम बाबत गडबड असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

International Tea Day 2025 २१ मे रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिन? महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस; भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त, ९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी

कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक पद्धती जाणून घ्या

गोव्यात पावसामुळे विमानांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता, इंडिगोने जारी केला सल्ला

'TIME100 Philanthropy 2025' च्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश

पुढील लेख
Show comments