विवाह अनेकदा एकाच वयाच्या लोकांमध्ये होतात. तथापि काही असामान्य विवाहांची प्रकरणे आहेत, ज्यामध्ये वधू आणि वर यांच्या वयात खूप फरक आहे. पश्चिम आफ्रिकेतील घाना येथून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे 63 वर्षीय पाद्रीने 12 वर्षांच्या मुलीशी लग्न केले आहे. जेव्हा लोकांना या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ते संतप्त झाले आणि त्यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली.
पाद्रीने मुलीशी लग्न केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार 63 वर्षीय पादरी, नुउमो बोरकेटे लावेह त्सुरु यांनी पश्चिम आफ्रिकेच्या घानामध्ये एका 12 वर्षीय मुलीशी लग्न केले. मुलगी फक्त 6 वर्षांची असताना हे लग्न निश्चित करण्यात आले होते. क्रोव्हरमधील नंगुआ येथे पारंपारिक सोहळ्यात हे लग्न पार पडले. या लग्नाची वृत्तवाहिनीवर चर्चा होताच एकच गोंधळ उडाला कारण हे बघून लोक संतापले.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दिसून आले आहे की लग्नाला डझनभर लोक उपस्थित होते, लोकांनी यावर आक्षेपही घेतला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, लग्नात सहभागी झालेल्या महिलांनी 12 वर्षांच्या मुलीला असे कपडे घालण्यास सांगितले होते जेणेकरून ती आपल्या पतीला आकर्षित करु शकेल. मात्र या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक लोकांनी या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यावर हा विवाह बेकायदेशीर आणि अनौपचारिक असल्याचे लक्षात आल्याने संताप निर्माण झाला. मात्र आता हे लग्न भंग करुन त्सुरूची चौकशी करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडून होत आहे. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत.
घानामध्ये विवाहाचे किमान वय 18 वर्षे आहे, परंतु काही समुदायांचे लोक अजूनही बालविवाह करतात आणि सरकार त्यावर कठोर कारवाई करत नाही. स्थानिक समुदायाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रथा आणि परंपरांबद्दलची समज नसणे आणि अशा विवाहाचे परिणाम निदर्शनास आणले.
file photo