उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील अमारिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत एक तरुण हाय व्होल्टेज लाईनवर झोके घेताना दिसला. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने हाय टेंशन लाइनला दोरीच्या रूपात पकडून ठेवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तारांना धरून तरुण कधी वर तर कधी खाली झोके घ्यायचा .
.
विजेच्या तारांवर असा धोकादायक स्टंट पाहून लोकांना आश्चर्य वाटले. तरुण स्टंट करण्यात मग्न होता, तर खाली उभ्या असलेल्या लोकांना शॉक लागण्याची भीती वाटत होती. लोकांनी तत्काळ वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून वीज वाहिन्या सुरू करू नका, असे कळवले.यानंतर वीज विभागाचे कर्मचारी आणि बाजारपेठेतील लोकांनी मिळून अथक परिश्रमानंतर तरुणाला खाली उतरवले.
लोकांनी सांगितले की युवकाचे नाव नौशाद आहे, तो रस्त्यावर हातगाडीवर बांगड्या विकतो. शनिवारी हातगाडी सोडून पायऱ्या चढून छतासमोरून जाणारी हाय टेंशन लाइन पकडून तो चक्क झोके घ्यायला लागला. सुदैवाने पावसामुळे काही कारणास्तव वीजपुरवठा बंद झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
नौशादच्या अशा कृत्याने बाजारात खळबळ उडाली. लोकांनी कसातरी तरुणाला खाली उतरवून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्या तो कधी कधी उलटसुलट वागू लागतो, असे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बाजारातील लोकांनी सांगितले की, तो रोज हातगाडीवर बांगड्या विकतो त्याला असे काही करताना कधीच पाहिले नाही. सध्या नौशाद त्यांच्या घरी असून ते कोणाला काही सांगत नाहीत किंवा कोणाला भेटत नाहीत.
स्थानिक व्यक्ती इम्रान कादरी यांनी सांगितले की, हा तरुण शेजारी बांगडीचा गाडा लावतो. शनिवारी तो अचानक विजेच्या तारांवर झुलायला लागला. सुदैवाने त्यावेळी..वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.