Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळणार

arun jetly
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारने  पंतप्रधान  वय वंदना योजनेअंतर्गत (PMVVY)ज्येष्ठ नागरिक १५ लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यातून त्यांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. एवढच नव्हे तर या योजनची अंतिम तारीख ४ मे २०१८ वाढवून ती ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. याआधी या योजनेअंतर्गत ७.५ लाख रुपये गुंतवणूक करता येत होती. केंद्रीय कॅबिनेटच्या मंजूरीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

केंद्राने सामाजिक सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे.  पंतप्रधान वय वंदना योजना (PMVVY)ही भारतीय जीवन बीमा निगम (LIC) तर्फे चालविली जात आहे. ६० वर्षांच्या वरील नागरिकांना सामाजिक सुरक्षा देणं यामागचा हेतू आहे. २०१८ पर्यंत २.२३ लाख वरिष्ठ नागरिकांनी या योजनेचा फायदा घेतलाय.

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७ साली या पेन्शन योजनेला सुरूवात केली होती. ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने ही योजना तुम्हाला घेता येऊ शकते. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पासून या योजनेला सवलत देण्यात आली आहे. पेंशन घेण्याच्या ३ वर्षांनतर कॅश गरज पूर्ण करण्यासाठी खरेदी किंमत ७५ टक्के कर्ज घेता येऊ शकते. पेंशनधारक पॉलीसी दरम्यान मृत्यू झाल्या खरेदी मुल्य लाभार्थिंना दिला जाईल. सरकारच्या सबसिडीच्या रुपात एलआयसी ही रक्कम देणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आईने मोबाईल वापरू दिला नाही, केली आत्महत्या