Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

WhatsApp वर आलेल्या या लिंकवर क्लिक करु नका, फॉरवर्ड करणे टाळा

WhatsApp वर आलेल्या या लिंकवर क्लिक करु नका, फॉरवर्ड करणे टाळा
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (10:37 IST)
सध्या व्हॉट्सअॅपवर असे मॅसेज खूप पाठवण्यात येत आहे ज्यात एक लिंक देण्यात येत आहे. मॅसेजमध्ये सांगितलं जात आहे की कोरोना महामारी काळात सरकारकडून आपल्याला मदत निधी दिली जात आहे आणि त्यासाठी आपल्याला या लिंकवर क्लिक करायचे आहे. परंतू आपल्याला या लिंकवर क्लिक करायचे नाही तसेच हा मॅसेज कुणालही फॉरवर्ड करायचा नाही असा सावध राहण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.
 
असे मॅसेज फेक असून हॅकर्सद्वारे सर्क्युलेट केले जात असल्याचे कळून आले आहे. सरकारकडून पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली गेली आहे. यात अशा प्रकाराचे मॅसेज फेक असल्याचे सांगितले गेले आहे. आणि स्पष्ट करण्यात आले आहे की सरकारने कोरोनासाठी कोणातही फंड जारी केलेला नाही. याने डाटा चोरी होऊन फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 
 
याप्रकारे सावध रहा
अनओळखी नंबरहून आलेल्या मॅसेजपासून सतर्क रहा. त्यावर विश्वास ठेवू नका.
फंड जारी करण्याच्या नावाखाली आपली खाजगी माहिती शेअर करु नका.
अशा प्रकाराच्या मॅसेजसोबत आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.
असे मॅसेज कुणालाही फॉरवर्ड करु नका.
कुणासोबतही बँक अकाउंट डिटेल शेअर करु नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई HC चा लक्ष्मी विलास बँकेच्या विलनीकरणाला स्थगिती देण्यास नकार