suvichar

बॅंकांना तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या

Webdunia
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (09:05 IST)
पुढील महिन्यात दिवाळीसह सणांची  मांदियाळीच असल्याने तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या असणार आहेत. साहजिकच बँकाही बंद राहणार असल्याने नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे.  धनत्रयोदशी (5 नोव्हेंबर), नरक चतुर्दर्शी (6 नोव्हेंबर), लक्ष्मीपूजन (7 नोव्हेंबर), पाडवा (8 नोव्हेंबर) आणि भाऊबीज (9 नोव्हेंबर) अशी चार दिवस दिवाळी आहे. यात सात नोव्हेंबरचे लक्ष्मीपूजन आणि आठ नोव्हेंबरचा पाडवा हे दोन दिवस सरकारी सुट्ट्यांचे आहेत. त्यानंतर 10 रोजी दुसरा शनिवार आणि अकराला रविवारी आहे. त्यामुळे या आठवड्यात चार दिवस बँका बंद राहतील.                   

13 आणि 14 नोव्हेंबरला काही राज्यांमध्ये पुन्हा बँकांना सुट्ट्या राहणार आहेत.  त्यानंतर 21 नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि 24 नोव्हेंबरला गुरू तेग बहादूर शहीद दिवस आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला गुरू नानक जयंती  आहे. यादरम्यान अधिकाधिक राज्यात सरकारी सुट्ट्या असतात. ज्यामुळे बँकाही बंद राहणार आहेत. दरम्यान, याविषयी काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सणांच्या वेळी एटीएमध्ये पैशाची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का; आदित्य ठाकरे यांचे निकटचे सहकारी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला

महाराष्ट्रात कारागृहांमध्ये शिक्षण घेत असलेल्या कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ९० दिवसांची सूट मिळणार

Fact Check: 1 जुलै 2026 पासून पेट्रोल बाईकच्या विक्रीवर बंदी येणार का? संपूर्ण सत्य जाणून घ्या!

LIVE: उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या वकिला कडून साहिल गोयलला १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस

पुढील लेख
Show comments