Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्राजक्ता बनली बॉलिवूड वाल्या ट्रेव्हल शो ची होस्ट

Becomes the host of the Bollywood Travel Show
, सोमवार, 27 जानेवारी 2020 (10:26 IST)
मराठी सिनेसृष्टीची बबली गर्ल प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता आहे. प्राजक्ताने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर केलेल्या पोस्टद्वारे ती लवकरच एका हिंदी शोमधून झळकणार असल्याचे जाहीर झाले आहे. बॉलीलॅण्ड्स.कॉम असे ह्या शो चे नाव असून हा एक पर्यटन संबंधित कार्यक्रम असणाऱ आहे. ह्या कार्यक्रमाद्वारे युएई मध्ये चित्रित झालेल्या हिंदी चित्रपटांच्या जागा, हॉटेल्स आणि समुद्र किनाऱ्याची सफर केली जाणार आहे. 
Becomes the host of the Bollywood Travel Show
प्राजक्ता या शोची होस्ट असणार आहे. प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. शिवाय यापूर्वी एका मराठी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. त्यामुळे, येत्या मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ह्या ट्रेव्हल शो द्वारे, प्राजक्ता हिंदी प्रेक्षकांनादेखील आपल्यात खिळवून ठेवेल यात शंका नाही.
Becomes the host of the Bollywood Travel Show

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kobe Bryant Helicopter Crash : बास्केटबॉलचा सुपस्टार खेळाडू ब्रायंटचं हेलिकॉप्टर अपघातात निधन