Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोक दीर्घायुषी

Believing people
नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची दीर्घायुषी होण्याची शक्यता जास्त असते. आस्तिक लोक नास्तिकांपेक्षा सरासरी चार वर्षे अधिक जगतात, असे अमेरिकेतील एका नव्या संशोधनातून पुढे आले आहे. सोशल सायकॉलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले असून ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधिका लॉरा वॅलेस यांनी हे संशोधन केले आहे. लॉरा यांनी संपूर्ण अमेरिकेतील 1000 व्यक्तींच्या श्रद्धांजलींचा अभ्यास केला. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनानावर लिंग आणि वैवाहिक स्थिती यांचा सर्वाधिक परिणाम होतो. त्याचा विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
धार्मिक श्रद्धा आणि एखादी व्यक्ती किती जगू शकते, याच्यात संबंध असल्याचा पुरावा या संशोधनातून दिसून येतो, असे विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक बाल्डविन वे यांनी सांगितले. या संशोधनात पहिल्या टप्प्यात डेस म्वॉन्स रजिस्टर या वृत्तपत्रात जानेवारी ते फेब्रुवारी 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या 505 श्रद्धांजलींचा अभ्यास करण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात अमेरिकेतील 42 शहरांतील वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर ऑगस्ट 2010 व ऑगस्ट 2011 या दरम्यान प्रकाशित झालेल्या 1096 श्रद्धांजलींचा अभ्यास करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने महाप्रसादात टाकलं होतं किटकनाशक