Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाय हिल्समुळे सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Kalyan
आईच्या हातून पडून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला  असून तिन्ने हाय हिल्सच्या सँडल घातले होते. मुंबई येथील  कल्याणमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. कल्याणच्या पश्चिम भागातील मातोश्री मंगल कार्यालयात  हा प्रकार घडला आहे.
 
मातोश्री मंगल   कार्यालयात लग्नासाठी उल्हासनगरला राहणाऱ्या फैमिदा हमीद शेख या आपल्या मोहम्मद हमीद शेख या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन आल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर घरी परतण्यासाठी येत होत्या तेव्हा ही घटना घडली  आहे.
 
हाय हिल्सच्या सँडलमुळे त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातून चिमुकला मोहम्मद थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला असून, इतका मोठा आघात सहन न झाल्याने   त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरगाबाद खुनी सत्र : भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला