rashifal-2026

फेसबुक वेड, दुचाकी चालवतांना केले लाईव्ह, २ ठार

Webdunia
मंगळवार, 17 जुलै 2018 (08:54 IST)
4
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात  वेगाने दुचाकी चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणे दोन तरुणांच्या जिवावर बेतले आहे. याघटनेत छत्तीसगडमधील बस्तर येथील मनीष कुमार आणि मुरली निषाद हे दोघे ताशी १९९ किमी प्रतितास वेगाने दुचाकी चालवत होते. मनीष कुमार दुचाकी चालवत होता तर त्याचा मित्र मुरली निषाद मागच्या सीटवर बसला होता. आपल्या मित्राची वेगाने दुचाकी चालवण्याची कामगिरी मुरली फेसबुकवर लाईव्ह करत होता. मनीषही फेसबुक लाईव्हकडे अधून-मधून लक्ष देत होता. यावेळी मित्रांकडून मिळणाऱ्या कमेंटमुळे त्यांना अधिकच चेव चढला. परंतु कांकेरजवळील चारामा भागामध्ये समोरच्या दिशेने येणाऱ्या बसकडे तरुणांचे लक्षच गेले नाही आणि बस चालकालाही काही समजायच्या आत दुचाकी समोरून बसवर जोरात धडकली.
 
सदरच्या अपघातामध्ये मनीषचा जागीच मृत्यू झाला तर मुरलीला स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, तरुणांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने कच्चून ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस कांकेरवरून रायपूरकडे जात होता. यात ३८ प्रवासी होते. जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

फोटो: सोशल मीडिया  साभार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'पायलट अचानक बदलले'; कागदपत्रे जळाली नाही पण मृतदेह जळाले; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते- संजय राऊत यांचा दावा

हरियाणाच्या देविका सिहागने थायलंड मास्टर्सचे पहिले विजेतेपद जिंकून भारताला गौरव मिळवून दिला

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

बीडमध्ये अपघातात शिवसेना नेत्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments