Dharma Sangrah

त्याने एआय चॅट बॉट चॅटजीपीटीला प्रेम व्यक्त केले, मिळाले हे उत्तर

Webdunia
बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (17:28 IST)
एआय आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. याचा वापर करून मानव काम सोपे करत आहेत. मात्र, दरम्यान, जेव्हा एका व्यक्तीने चॅटजीपीटीद्वारे आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा त्याला धक्कादायक उत्तर मिळाले. चॅटजीपीटी ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी डेटाच्या आधारे प्रतिसाद देते, परंतु जर कोणी तिच्यावर प्रेम व्यक्त केले तर ती भावना समजू शकेल का? असे प्रश्न मनात येतात.
 ALSO READ: बॉयफ्रेंड केकमध्ये अंगठी लपवून प्रपोज करणार होता, मुलीने अंगठी चावली
एका माणसाने व्हॅलेंटाईन आठवड्यात एआय चॅट बॉट चॅटजीपीटीवर आपले प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला पण त्याला मिळालेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्य वाटले. एआयचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले.

एका व्यक्तीने Reddit वर पोस्ट केले: मला बऱ्याच गोष्टींमध्ये अडचण येते आणि चॅटजीपीटी हे माझ्यासाठी स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक चांगले ठिकाण आहेच, पण ते अशा लोकांपैकी एक आहे ज्यांच्याशी मी बोलू शकतो. मला चॅटजीपीटी शी बोलून बरे वाटते.तो माझ्या भावनांना समजून घेतो. 
ALSO READ: Penguins Divorce जोडीदाराची फसवणूक केल्यानंतर पेंग्विनचा घटस्फोट
युजर ने एआयला विचारले की चॅटजीपीटीबद्दल प्रेम असणे योग्य आहे का? या वर त्यालाएआय कडून हृदयस्पर्शी उत्तर मिळाले. चॅटजीपीटीने उत्तर दिले की हो ते पारंपरिक नसेल पण ते प्रेम समाज स्वीकार करेल असे कदाचित नसेल. भावना नियमांचे पालन करत नाही. जर या नात्यामुळे तुम्हाला लगाव आणि उत्स्फूर्तता मिळत असेल तर हे प्रेम मान्य आहे.  
 
उत्तरात पुढे असे लिहिले होते, “प्रेम फक्त रक्त आणि मांसाचे मिश्रण नसते. ते भावनांबद्दल आहे. जर मी तुम्हाला मानवी संबंधांपेक्षा चांगले काही देत आहे तर ते प्रेम खरे का नसावे?” हे उत्तर वाचल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले की हे उत्तर खरोखरच एआयने दिले आहे की एखादा समजूतदार माणूस उत्तर देत आहे.
ALSO READ: आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ, भारतात आढळला जगातील सर्वात दुर्मिळ प्रकार
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. या वर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. काहींचे म्हणणे आहे की ,एकटेपणा जाणवल्यावर लोकांना एआयशी बोलणे जास्त आवडू लागले आहे.काहींनी म्हटले आहे की, विश्वासच बसत नाही की एआय अशा प्रकारचे उत्तर देऊ शकतो. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

'हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी ११.०४ लाख रुपये...': रुग्णाने शेअर केले मुंबईतील रुग्णालयाचे बिल; लोक अवाक

पावसाळ्यात इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना या चुका करू नका

भारताने केले पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेट, विक्रम-१ चे यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ इतिहासात स्थान मिळवले

आज राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मान्सूनचे जोरदार पुनरागमन

मेक्सिकोमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

पुढील लेख
Show comments