फोर्ब्सने 2018 तील जगातील सर्वात जास्त कमाई करणार्या खेळाडूंची यादी काढली आहे. या लिस्टमध्ये टॉप 100 मध्ये एकही महिला एथलीट सामील नाही आहे, तसेच जर भारतीयांची गोष्ट केली तर यात फक्त एकच नाव आहे. टॉप-100 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली एकुलता भारतीय एथलीट आहे. विराट या लिस्टमध्ये 83व्या नंबरावर आहे.
विराटची कमाई 24 मिलियन अमेरिकी डॉलर (किमान 161 कोटी रुपये) एवढी आहे. 2018 मध्ये टॉप-100 मध्ये एकही महिला एथलीटचे नाव न होणे फारच आश्चर्यकारक बाब आहे. फोर्ब्सच्या लिस्ट प्रमाणे 11 खेळांचे एथलीट या टॉप-100 लिस्टमध्ये सामील आहे. टॉप-100 मध्ये 40 तर बास्केटबॉल खेळाडू सामील आहे. या लिस्टमध्ये टॉपवर 41 वर्षीय बॉक्सर मेवेदर आहे, ज्याची कमाई 284 मिलियन अमेरिकी डॉलर आहे.
मागच्या वर्षी सेरेना विलियम्स या लिस्टमध्ये सामील एकुलती महिला एथलीट होती, पण यंदा ती देखील या लिस्टमध्ये आपली जागा बनवण्यात अपयशी ठरली आहे. मेवेदरनंतर दुसर्या क्रमांकावर फुटबॉलर लियोनल मेस्सी आणि तिसर्या क्रमांकावर फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. चवथ्या क्रमांकावर मिक्स्ड मार्शल आर्टचे कोनोर मॅकग्रिगॉर आणि पाचव्या क्रमांकावर फुटबॉलर नेमार आहे. विराट या लिस्टमध्ये एकुलता भारतीय असून एकुलता क्रिकेटर देखील आहे. उसेन बोल्ट या लिस्टमध्ये 45 व्या क्रमांकावर आहे.