Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राहुल गांधी मला आवडतात मी हे काही आज सांगत नाही - शिवसेना नेते संजय राऊत

राहुल गांधी मला आवडतात मी हे काही आज सांगत नाही - शिवसेना नेते संजय राऊत
, शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (10:14 IST)
शिवसेना नेते संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात ते बोलत होते की मला राहुल गांधी आवडतातहे मी आज सांगत नसून, ही मी हे आगोदर पूर्वी देखील बोललो आहे. राहुल ने कधीही फसवी आश्वासनं दिलेली नाहीत. राहुल यांची नेहमी थट्टा केली गेली, पण गांधी घराण्याने देशासाठी जो त्याग केलाय तो आपण विसरून कसे चालणार आहे. तुम्हाला त्यांची धोरणं पटत नसतील तर त्यावर टीका करा परंतु कुणावर व्यक्तिगत टीका करणे आपल्याला अजिबात मान्य नाही. सध्या पाहिले ते राजकारण विखारी होत चाललंय. विष जास्त फुत्कारणारा नेता जास्त लोकप्रिय असा लोकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे, असे मत ज्येष्ठ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक केले आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या आपल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने कलर्स मराठीवरील होते. 
 
कार्यक्रमाचे सूत्रधार मकरंद अनासपुरे यांनी संजय राऊत यांना राजकारणामुळे नाती दुरावतात का, असा प्रश्न विचारला होता. राऊत यांनी होकार दिला. परंतु राजकारणात मतभेद असतील तरी नाती दुरावली जाऊ नयेत, असे मला तरी वाटते. पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे असे नेते आहेत, जे सर्वाना एकत्र घेऊन पुढे गेले आहेत. त्यांनी अडचणीच्या वेळेस जात, धर्म, राजकीय पक्ष न पाहता लोकांच्या पाठीशी उभं रहाण्याचे धारिष्ट्य ते अनेकदा दाखवले आहे. बाळासाहेब यांच्यासारखा थोर नेता होणे नाही. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ चा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी २५ जानेवारीला रात्री सडे नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लातूर लोकसभा मतदारसंघात मातंग समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी