Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विखे पाटील यांची नात नीला स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार

Indian origin Nila Vikhe Patil
आपल्या देशाचे नाव पुन्हा उंचावले असून त्यातही राज्याचे नाव मोठे झाले आहे. भारतीय वंशाच्या आणि परदेशात आता नेहमीसाठी स्थायिक झालेल्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जानेवारीत स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करणार आहे.

नीला  ३२ वर्षीय नीला ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहणार आहे. याबद्दल माहिती अशोक विखे पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली. स्वीडन येथे जन्म झालेल्या नीला या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही देखील आहे. 

नीला माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत. नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आईची क्रूरता, 5 वर्षाच्या मुलीला दिले मेणबत्तीचे चटके