Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय शेफ डे निमित्त’ केले गरजू मुलांना अन्नदान

international chef day
, बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (14:33 IST)
मुंबई: आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या दोन्ही कॅम्पसमध्ये म्हणजेच मुंबई आणि नवी मुंबई कॅम्पसने आंतरराष्ट्रीय शेफ डे आणि वर्ल्ड फूड डे साजरा केला आणि फूड इंडस्ट्रीमधील प्रशंसनीय शेफसमवेत जेवण बनवून प्रेमदान अनाथाश्रम, खारघर, सेंट ऑर्फनेज होम, स्पार्क-ए-चेंज फाउंडेशन आणि स्कूल ऑन व्हील्स, मुंबई यांच्या विद्यार्थ्यांना अन्नदान केले. आयटीएम आयएचएमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राध्यापक शेफ आणि उद्योग शेफसमवेत ४५० पेक्षा जास्त मुलांसाठी पौष्टिक जेवण तयार केले. तयारीसाठी लागणाऱ्या संपूर्ण सामग्री आयटीएम आयएचएम आणि उद्योग प्रायोजक वेझले सोया चॉप्स, वीबा (केक मिक्स) आणि स्टोरिया (दुधावर आधारित पेय) यांनी पुरविला.
 
यावेळी बोलताना उज्वला सोनवणे, असोसिएट डीन म्हणाल्या, “ जेवण तयार करण्यास उत्सुकता दाखविल्याबद्दल आणि या उदात्त उपक्रमाचा एक भाग बनल्या बद्दल आयटीएममधील आमच्या विद्यार्थ्यांचा मला अभिमान आहे. आयटीएममध्ये आम्ही विद्यार्थ्यांना नेहमीच जॉय ऑफ गीव्हिंग शिकवतो आणि विद्यार्थ्यांमध्ये समग्र विकास साधण्याचा प्रयत्न करतो."
international chef day
आंतरराष्ट्रीय शेफ डे प्रत्येक वर्षी २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील मुलांना निरोगी खाण्याचे महत्त्व, शेफच्या कारकीर्दीस प्रोत्साहित करण्यासाठी आणि स्थानिक समाज बदलण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ आंदोलन, त्याची सुटका