Marathi Biodata Maker

एका घरात ११ लोकांनी केली आत्महत्या

Webdunia
सोमवार, 2 जुलै 2018 (09:02 IST)
दिल्लीतील बुराडी परिसरात एकाच घरात तब्बल 11 मृतदेह सापडले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार घराच्या तपासात कागदावर हाताने काहीतरी लिहिलेल्या मजकुराच्या चिठ्ठ्या आढळल्या आहेत. यावरील मजकूर काळ्या जादूशी किंवा तंत्र मंत्राशी संबंधित असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. बुराडी परिसरात ज्या 11 जणांचे मृतदेह सापडले त्यापैकी 10 मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. तसेच ते सगळेच फासावर लटकले होते. सामूहिक आत्महत्येचा प्रकार असेल तर आत्महत्येच्या वेळी घराचे दार उघडे कसे असेल असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबियांनी त्यांचा किराणा दुकान शनिवारी रात्री पावणे बारा वाजता बंद केले होते. या प्रकरणाने दिल्ली हादरली आहे. पोलीस सर्व अंगाने तपास करत असून कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पावसाचा यलो अलर्टचा इशारा जारी

LIVE: आरटीआय नियमांमधील बदलांवरून अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण गणपतीपुळे नदीत बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

आरटीआय नियमांमधील बदलांवरून अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा

नागपूरात नीट परीक्षेसाठी पोलिसांची कडक कारवाई, रविवारी झेरॉक्स केंद्रे बंद राहणार

पुढील लेख
Show comments