Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिबट्यासोबत कुत्रा 7 तास अडकला टॉयलेटमध्ये, बाहेर निघल्यावर काय बघायला मिळाले

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (17:36 IST)
बिबट्या समोर आल्यावर प्रत्येकाची घाबरगुंडी उडेल अशीच कल्पना आपण करु शकतो पण बिबट्याबरोबर एका खोलीमध्ये बंद होण्याची वेळ आली तर कल्पना करुन सुद्धा घाबरायला होतं. पण 
 
अशी एक घटना एका कुत्र्याबरोबर घडली आणि काही मिनिटांसाठी नव्हे तर तब्बल 7 तास कुत्रा एका बिबट्यासोबत शौचालयामध्ये अडकला होता. विशेष म्हणजे कुत्रा सुखरुप आहे. हे कसे घडले 
 
ते तर माहित नाही परंतू या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 
 
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिलिनेले गावात ही घटना घडली. येथे एक महिला सकाळी 7 वाजता घराबाहेर असलेल्या शौचालयामध्ये जात असताना तिची नजर आत असलेल्या बिबट्यावर पडली आणि तिने लगेच बाहेरुन दार बंद करुन घेतले. 
 
नंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले यासाठी सुमारे सात तास लागले. दरम्यान ट्विटर अकाउंटवर शौचालयात अडकलेल्या बिबट्या आणि कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. टॉयलेटच्या छतावरील पत्रे काढून हा फोटो काढण्यात आला आहे.
 
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न केले पण बिबट्या पळून गेला. नंतर कुत्र्याला जिवंत बाहेर काढले. हा कुत्रा जिवंत कसा राहिला हे जाणून घेण्याबाबत सर्वांना उत्सुकता होती. नंतर भारतीय वनसेवा अधिकारी प्रविण कासवान यांनी या घटनेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की  'प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस असतो. हा कुत्रा बरेच तास बिबट्यासोबत कैद राहून सुद्धा जिवंत बाहेर आला. हे फक्त भारतामध्येच होऊ शकते'.

<

Every dog has a day. Imagine this dog got stuck in a toilet with a leopard for hours. And got out alive. It happens only in India. Via @prajwalmanipal pic.twitter.com/uWf1iIrlGZ

— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) February 3, 2021 >कुत्र्याला स्थानिक नागरिक 'बोलू' या नावाने हाक मारतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments