Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
असे बघण्यात येते की बऱ्याच वेळा गाडीने होण्याऱ्या अपघातात गाडीचा मालक पळून जातो. पोलिसांना त्याचे शोध घेणे अवघड जाते पण आता असे होणे शक्य नाही. भारत सरकारने अशी website बनवली आहे. ज्याचा वर गाडीचा नंबर टाकताच त्या गाडीचे मालकाची संपूर्ण माहिती मिळेल. तसे तर google play store वर असे बरेच अॅप आहेत पण त्यावर गाडीची संपूर्ण माहिती मिळत नाही. त्यावर अनेकदा केवळ मॉडेल नंबर आणि इंजिन नंबर मिळतो. भारत सरकारची
https://parivahan.gov.in/rcdlstatus/ या वेवसाइटवर आपणास संपूर्ण माहिती मिळू शकेल.
state transport department ने पण वेगवेगळ्या web site बनवल्या आहे. उदाहरणार्थ जर का आपणास मध्य प्रदेशच्या गाडीच्या मालकाची माहिती पाहिजे असेल तर transport department of madhya pradesh ने www.mptransport.org ही website बनवली आहे. येथे गाडीचा नंबर टाकताच ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.
RTO च्या मोबाईल नंबर 7738299899 वर sms करून पण गाडीच्या मालकाची माहिती मिळू शकेल. तसेच गाडी साठी कुठल्या बँकेने फायनान्स केला आहे हे देखील कळू शकते.