Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या विहिरीच्या पाण्यात कोणत्याही वस्तूचा बनतो दगड

या विहिरीच्या पाण्यात कोणत्याही वस्तूचा बनतो दगड
, मंगळवार, 13 मार्च 2018 (10:40 IST)
जगामध्ये काही अशी भीतीदायक व गूढ स्थळे आहेत, ज्यांचे नाव घेतले तरी लोकांच्या छातीत धडधडू लागते. ब्रिटनच्या न्यूर्जबरमधील एका विहिरीचे पाणी अशाच दहशतीसाठी जगभर ओळखले जाते. असे सांगतात की, या विहिरीच्या पाण्यात जे काही पडते, त्याचे दगडात रुपांतर होते. या अनोख्यापणामुळेच स्थानिक या विहिरीला राक्षसी विहीर मानतात. तिच्या पाण्यात पडणारी झाडाची पाने, लाकडे वा एखादा जीव सगळ्यांचाच दगडामध्ये कायापालट होतो. नदीच्या काठावर असलेल्या या विहिरीजवळ जाणे कुणीच पसंत करत नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, समजा तेही या विहिरीच्या संपर्कात आले तर कदाचित दगडामध्ये परावर्तीत होतील. मात्र या विहिरीच्या पाण्याच्या या वैशिष्ट्याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. या भागात सहलीसाठी येणारे लोक आपल्या काही वस्तू या विहिरीच्या पाण्यात सोडून जातात व नंतर काही दिवसांनी येऊन त्यांचा दगड बनलेला पाहतात. तिथे आजही 18व्या शतकातील व्हिक्टोरियन टॉप हॅटसारख्या वस्तू पाहण्यास मिळतात. टेडी बियर, सायकल व किटलीसारख्या वस्तूही आता पूर्णपणे दगडात बदलल्या आहेत. आता हे स्थान पर्यटनस्थळाच्या रुपातही विकिसत होत आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, या विहिरीच्या पाण्यात कोणत्याही वस्तूचा दगडामध्ये कायापालट करू शकणारे काही घटक मोठ्या प्रमाणात आहेत. अर्थात लोक मात्र या विहिरीला झपाटलेली सजतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकहिताचे निर्णय घेण्यात कायम अग्रेसर असणारा नेता