Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिशान उडणारी बोट येणार, लवकरच पाण्यासोबत हवेत फेरफटका मारता येणार

Webdunia
गुरूवार, 13 जानेवारी 2022 (14:14 IST)
पाण्यासोबत हवेत आलिशान फेरफटका मारण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इटालियन कंपनी अशी आलिशान नौका बनवणार आहे जी हवेत सहज उडू शकते. ही उडणारी नौका सुमारे 490 फूट लांब असेल आणि तिला 'एअर यॉट' म्हटले जात आहे. 60 नॉट्स किंवा 112 किमी प्रतितास वेगाने उडू शकणार्‍या कोरड्या कार्बन फायबर रचनेसह ही नौका तयार केली जात आहे.
 
उड्डाणात मदत करण्यासाठी या यॉटमध्ये चार सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक प्रोपेलर बसवण्यात आले आहेत. त्यात हेलियमने भरलेले फुगे असतात. याच्या मदतीने उडणे शक्य होणार आहे. याने घिरट्या घालता येतील आणि पाण्यावर पोहूता देखील येईल. हवाई नौका हवेत राहू शकते कारण तिचे फुगे हेलियमने भरलेले असतात, जे हवेपेक्षा हलके असते. आणि प्रोपेलर त्याला उडण्यास मदत करतात. हवाई नौका बनल्यावर त्याची किंमत किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lazzarini (@lazzarinidesign)

दोन महाकाय फुग्यांव्यतिरिक्त 8 इंजिन बसवण्यात येणार आहे
नौकेवर कोट्यवधी रुपये खर्च करू शकणार्‍या खाजगी मालकांना लक्षात घेऊन त्यांनी याची रचना केल्याचे कंपनीने म्हटले आहे. या संपूर्ण कार्बन फायबर संरचनेचा आकार सुमारे 300 फूट असेल. त्याची रुंदी 260 फूट असेल. या यॉटमध्ये दोन महाकाय फुग्यांशिवाय 8 इंजिन बसवण्यात येणार आहेत. ही सर्व इंजिने लाईट बॅटरी आणि सोनल पॅनलवर चालतील. ही बोट 60 नॉट्स किंवा 112 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकेल, असे लझारीनी कंपनीने सांगितले.
 
ही नौका 48 तास सतत उडू शकते
कंपनीने सांगितले की, 'एअर यॉट हे विमान नाही जे सामान्य माणसाला घेऊन जाईल किंवा पर्यटकांसाठी असेल. ज्या खाजगी मालकांना प्रशस्त नौका हवी आहेत त्यांना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. या यॉटमध्ये बेडिंग आणि आंघोळीच्या सुविधांसह खाजगी सूट असतील. यामुळे प्रवाशांना लांबच्या प्रवासात बरेच दिवस घालवता येतील. या नौकेवर मुक्काम केल्याने प्रवाशांना पाण्यात राहूनच लाटा पाहता येणार असून 5 हजार फूट उंचीवर ताजी हवेचा श्वासही घेता येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments