Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्टर ब्लास्टर सचिन शोधतोय 'ही' कार कदाचित तुम्ही मालक असाल !

master blaster
, शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (09:00 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे एकापेक्षा एक महाग गाड्या असणार्‍या सचिनला एका अशा गाडीचा शोध आहे, जी सध्या बाजारात उपलब्धच नाही. सचिनला हवी असलेली गाडी कोणतीही विंटेज कार नाही. तर सचिन मारुती सुझुकी 800 या गाडीचा शोध घेत आहे.
 
भारतातील रस्त्यांवर एकेकाळी मारुती सुझुकी 800 दिसून येणारी लोकप्रिय गाडी होती .पण सचिनसाठी ही गाडी फक्त मारुती सुझुकी 800 नसून त्याची पहिली गाडी होती. त्याला सर्वात पहिली गाडी मारुती 800 परत हवी आहे. कारण क्रिकेटर झाल्यानंतर त्याने ती गाडी स्वतःच्या कमाईने खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीसोबत त्याच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. म्हणूनच त्याला ही गाडी परत हवी आहे. ही गाडी परत मिळवण्यासाठी सचिन आता देशातील जनतेची मदत घेणार आहे.
 
’माझी पहिली गाडी मारुती सुझुकी 800 होती. दुर्देवाने ती आता माझ्याकडे नाही. मला माझी गाडी परत हवी आहे. त्यामुळे जे आता मला पाहत आहेत. त्यांना माझ्या गाडीबाबत काहीही माहिती असेल तर माझ्याशी संपर्क साधा असे म्हटले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संसदीय स्थायी समितीने फेसबुकला 2 सप्टेंबरचे बजावले समन्स