सध्या सोशल मिडीयावर धमाकेदार अन मीटूमीटू चर्चा चालू आहे. विनयभंग असेल बलात्कार असेल ही विकृतीच अन ह्या विकृतीला नक्की कोण जबाबदार हे बघनही तेवढच आवश्यक आहे. #metoo चळवळीला पाठींबा तर आहेच पण आधी काही प्रश्न ही आहेतच अन ते महत्वाचे आहेतच. त्या कडे त्याकडे गांभार्याने बघन गरजेच.
स्त्री म्हटलं म्हणजे आई, वहीनी, बहीन, पत्नी गृहीणी अशा बर्याच भूमिका स्त्रीच्या असतात. अन स्त्री ह्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावत असतेच. आदीशक्तीच हेरुप, देवानेही स्त्रीला वरीच वरदान दिलेली दिसतात, त्या शक्तीच्या बळावर स्त्री आज प्रत्येक भुमिका निभावत असतेच.आपणही कुणाच्या गर्भातून जन्म घेतलेलाच असतो आपल्यावर त्या कर्ज तर असतच. अशा स्त्री जातीला मानाचा मुजरा अन प्रत्येक पुरुषाच्या यशाच कारणही स्त्रीच असते. पण ही सर्व चांगली अन देवत्व प्राप्त झालेल्या स्त्रीवर जर हत्याचार होत असतील तर आपण ह्या माणवजातीत माणव जातीला कलंक आहात.
पण #metoo चा विषयही थोडा आगळा वेगळा आहे. बॉलिवूड, क्रिकेट, राजकारण यातील बरेच जण #metoo चे शिकारी झालेत. नाना पाटेकरांपासून तर केंद्रिय मंत्र्यांपर्यंत आरोप झालेत. पण शंका मनात एकच व्यक्ती कुठलीही ह्या महीलांना आरोप करायला एवढा उशीर का? त्याच वेळेला आरोप करायला काही हरकत नव्हती. आरोप केलाय अन आता तुम्हीम्हणाल म्हणून ती व्यक्ती दोषी कशी असू शकते. कारण ज्यांच्यावर आरोप झालेत ते यशस्वी कलाकार क्रिकेट पटू अन यशस्वी. राजकारणी आहेत तेव्हा आरोप सत्य असतील तर ते पुराव्या सहीत सिद्ध करा नाहीतर ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची माफी मागा. मिडीयात येऊन बडबड करण्यापेक्षा पोलिसांत जाऊन गुन्हानोंदवा अन पुराव्यांसह मिडीयात या. समर्थन तर कुणाच करणार नाही. जो ह्या प्रकरणात दोषी आहे त्याला कठोर शिक्षा तर झालीच पाहीजे.
काही वेळेला महीला दबावा मुळे गुऩ्हा दाखल करु शकत नाही पण अशा बर्याच महीला आघाड्या आहे तिथे जा अन तुमची कैफियत मांडा त्याच्यासमोर न्याय मिळेल नक्की मिळेल. पण मिडीया किंवा त्या व्यक्तिने ते कृत्य केलय याचा पुरावा नाही अन फक्त हवेत आरोप होत असतील तर ते साफ चुक आहे.
काही शासनानेही खबरदारी घ्याला हवी आहेत. शासकीय कार्यलयात 24 तास कँमेरा असायला हवाय. महीलांसाठी वेगळ्या बसेस असायला हव्या आहेत. कर्मचारी महीला रात्री उशीरा पर्यंत काम करणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. महिलांनीही काही खबरदारी घेणे गरजेचे आहेच. मोबाईल स्टोर जाऊन तिथ रिचार्ज करु नये. प्रत्येक महीलेने एकट न घराबाहेर पडता मैत्रिनी बरोबर किंवा कुणी तरी आपल्या बरोबर येईल ही खबरदारी घ्यायलाच हवी. महिलांसांठी साहसी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. महीलांनी वेळीच आवाज उठवण्याची गरज आहे.