पीएम नरेंद्र मोदींचा एक इंटरव्यू खूप व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राइक दरम्यान वादळ आणि हवामानबद्दल केलेल्या कमेंटची खूप चर्चा होत आहे. आता त्यांच्या ईमेल बद्दल माहितीवर लोक हैराण झालेत.
सर्वात पहिल्यांदा ईमेल कधी वापरलं होतं? हा प्रश्न सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे. कारण मोदींनी एका मुलाखतीत सांगितले की, 1987-88 च्या दरम्यान मी डिजिटल कॅमेरामध्ये पहिल्यांदा फोटो काढला असून ईमेलद्वारे फोटो पाठवला होता.
सोशल मीडियावर हा इंटरव्यूह खूप व्हायरल होत आहे. लोक हैराण असून या दाव्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.
यावर बॉलीवूड कलाकार आणि बंगलुरु येथून निवडणुक लढत असलेले प्रकाश राज यांनी कमेंट केलं आहे.
आमच्या माहितीप्रमाणे तर असे 90 च्या दशकात झाले होते परंतू आमच्या चौकीदाराकडे डिजीटल कॅमेरा आणि ईमेलची माहिती 80 च्या दशकापासून होती... तसे तर ते जंगलात होते... महाभारात वाचत... ढगांभोवती...मूर्ख बनवण्याची पण मर्यादा असते भाऊ...