आपण लग्न मंदिरात, कोर्टात होताना पहिले असेल पण रुग्णालयात लग्न होताना फक्त चित्रपटातच बघितले आहे. पण बिहारच्या गया मध्ये रुग्णालयात आयसीयू मध्ये लग्न होण्याचे असेच एक प्रकरण आले आहे. येथे एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एक मरणासन्न महिलेने आपली शेवटची इच्छा सांगितली. आणि तिच्या इच्छे प्रमाणे तिच्या मुलीचे लग्न केले आणि काहीच वेळात महिलेचा मृत्यू झाला.
बिहारच्या गया जिल्ह्यात गुरुरू ब्लॉक मध्ये बाली गावात राहणारे लालन कुमार वर्मा यांच्या पत्नी पूनम वर्मा यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांना अर्श रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा कडे वेळ कमी असून त्यांचा मृत्यू कधीही होऊ शकतो असे सांगितले. आपण जिवंत असे पर्यंत मुलगी चांदनी हिचे लग्न पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आईच्या इच्छेचा मान राखून मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि 26 डिसेंबर रोजी सलेमपूर गावात राहणाऱ्या सुमित गौरव या तरुणाशी तिचा साखरपुडा ठरला होता. मात्र आईने त्याच दिवशी साखरपुडा आणि लग्न करण्याचे सांगितले आणि त्या दोघांनी आयसीयूच्या दाराबाहेर लग्न केले पूनम या लग्नाची साक्षीदार बनली. आपण जिवंत असताना मुलीचे लग्न पाहण्याची इच्छा पूर्ण झाल्यावर दोन तासांनी लगेचच पूनमने प्राण सोडले. पूनम वर्मा मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये कोरोना काळापासून त्या सतत आजारी असून हृदयविकाराचा त्रास होता. अखेर त्यांची इच्छा पूर्ण होऊन त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांचा मृत्यू नंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.